शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बीफवरील वक्तव्यावरून पर्रीकरांच्या राजीनाम्याची विहिंपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:34 IST

. गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या या वक्तव्यावरून नाराज झालेल्या विश्व हिंदू परिषदेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19-  राज्यात बीफची कमतरता होऊ नये, यासाठी सरकारनं कर्नाटकातून बीफ आयात करण्याचा पर्याय कायम ठेवण्यात आला आहे, असं विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी केलं होतं. गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या या वक्तव्यावरून नाराज झालेल्या विश्व हिंदू परिषदेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनोहर पर्रीकर यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून भाजपची प्रतिमा मलिन केली आहे, असं विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे. भाजप हा ‘बीफ जॉय’ पक्ष झाला आहे का, असा सवालही जैन यांनी उपस्थित केला आहे. भाजपची मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करायची असल्यास पर्रिकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी ट्विटमधून केली आहे. 
 
आणखी वाचा
पाकिस्तान नव्हे चीन भारताचा मोठा शत्रू - मुलायम

धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा

संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत असं म्हटलं की, आम्ही बेळगावातून बीफ आयात करण्याचा पर्याय बंद केलेला नाही, जेणेकरुन राज्यात बीफची कमतरता भासू नये. भाजपाचे आमदार नीलेश काब्राल यांनी बीफसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मनोहर पर्रीकर यांनी हे उत्तर दिलं. गोव्यात दिवसाला किती बीफची गरज भासते आणि ती कशी भागवली जाते, याची माहिती मागितली होती. गोव्याची गरज भागवताना गोवा मांस प्रकल्पातून 2 क्विंटल बीफ पुरवलं जाते. उर्वरित गरज ही कर्नाटकातून येणा-या मासांतून भागवली जाते, असे यावेळी मुख्यमंत्र्यानी सांगितलं. यावर पर्रीकर यांनी असंही सांगितलं की, मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो की शेजारील राज्यातून येणा-या बीफची योग्य तपासणी अधिकृत व्यक्तींद्वारे केली जाईल. पर्रीकर असेही म्हणाले की, जवळपास 40 किलोमीटर दूरवर असलेल्या पोंडामधील गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये राज्यातील एकमेव अशा अधिकृत कत्तलखान्यात दररोज जवळपास 2,000 किलोग्रॅम बीफ तयार केले जाते.

 
पुढे पर्रीकरांनी असेही स्पष्ट केले की, उर्वरित बीफचा पुरवठा कर्नाटकातून होता.  गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये शेजारील राज्यातून कत्तलींसाठी येणा-या जनावरांवर बंदी आणण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. राज्यात येणारे पर्यटक व येथील अल्पसंख्यांक समूह बीफचे सेवन करतात, त्याचे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येपासून 30 टक्के अधिक आहे. 
 दरम्यान, गोव्यात बाहेर राज्यांतून येणा-या बीफची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले. राज्यात दररोज 2.3 ते 2.4 क्विंटल बीफची विक्री होत असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्याबाहेरुन येणा-या बीफची आरोग्याच्या दृष्टीनं चौकशी होणं गरजेचं असल्याची मागणीही काब्राल यांनी केली होती.