शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नामपूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

पंधरा जागा : २२ मार्च रोजी मतदान

पंधरा जागा : २२ मार्च रोजी मतदान
नामपूर : नामपूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी समन्वयातून संस्थेची निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण करावा, अशी मागणी सभासदांकडून व्यक्त होत आहे.
संस्थेच्या १५ जागांसाठी २२ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वसाधारण प्रवर्गाच्या दोन जागांची वाढ झाली आहे. सर्वसाधारण- १०, महिला प्रवर्ग- २, अनुसूचित जाती-जमाती- १, इतर मागास प्रवर्ग- १ व भटक्या जाती-जमाती- १ अशा १५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० ऑक्टोबर २०१२ पर्यंत सभासद झालेले ८२० मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीच्या पहिल्या दिवशी (दि. १२) ३५ उमेदवारांनी नामांकनपत्र घेतले आहे. सोमवारपर्यंत (दि. १६) उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १८ फेब्रुवारीला, तर माघारी ७ मार्च रोजी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. गायकवाड यांनी सांगितले.
२६ सप्टेंबर १९९१ रोजी नामपूर येथे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना झाली. बागलाण व देवळा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे २० कोटी रुपयांची आहे. गेल्या १८ वर्षांपासून संस्थेवर प्राथमिक शिक्षक संघाची निर्विवाद सत्ता कायम आहे. राष्ट्रीय पातळीवरील सहकार कायदा अस्तित्वात आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला सुमारे अडीच वर्षांचा जादा कार्यकाळाचा बोनस मिळाला. यंदाच्या निवडणुकीत सत्तारूढ प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समिती अशा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून होणारी लाखो रुपयांची उधळप˜ी रोखण्यासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेची बाब आहे.
संस्थेची आर्थिक स्थिती
भागभांडवल- ७ कोटी ५८ लाख
कर्जवाटप- १४ कोटी रुपये
नफा वाटणी- ७२ लाख रुपये
ठेवी- ४ कोटी ५६ लाख रुपये