शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

By admin | Updated: May 4, 2017 01:27 IST

पाकिस्तानचे सैनिक दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून पाकिस्तानात परत गेले याचे पुरावे आहेत, असे भारताने

नवी दिल्ली : पाकिस्तानचे सैनिक दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून पाकिस्तानात परत गेले याचे पुरावे आहेत, असे भारताने म्हटले. दोन जवानांच्या शिरच्छेदानंतर संतप्त भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बुधवारी पाचारण करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बासित यांना बोलावून घेतले होते. १ मे रोजी जम्मूत पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांना ठार मारून त्यांचा शिरच्छेद केला होता, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले. पाकिस्तानच्या बट्टल सेक्टरमधील (बट्टल खेड्याच्या परिसरात) ठाण्यांनी गोळीबार सुरू ठेवून मारेकऱ्यांना संरक्षण पुरवले होते हे महत्त्वाचे. भारतीय जवानांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून, रक्ताचा माग रोझा नाल्यापर्यंत जातो. यावरून हे स्पष्ट आहे की, जवानांचे मारेकरी सीमारेषा ओलांडून आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. नायब सुभेदार परमजित सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने पूंछ भागात २५० मीटर आत येऊन ठार मारले व त्यांचा शिरच्छेद केला. पाकिस्तानच्याच सैनिकांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला याचे पुरेसे पुरावे आहेत व पाकिस्तानने मारेकऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे, असे भारताने बुधवारी म्हटले. शिरच्छेदाचा प्रकार हा पूर्णपणे चिथावणी देण्याचाच असल्याचे भारत मानतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले. भारतीय जवानांच्या विटंबनेमध्ये पाकिस्तानी लष्कर सहभागी आहे, असे सरकारने ठामपणे म्हटले. पाकव्याप्त काश्मीरच्या भारताकडील भागातून मारेकरी आले आणि परत गेले.नेहमीप्रमाणे पाकिस्तानकडून इन्कारअब्दुल बासित यांनी पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांच्या शरीराची विटंबना केल्याचा इन्कार केला, असे बागले यांनी सांगितले. भारताचे म्हणणे माझ्या सरकारला कळवीन, असे बासित यावेळी म्हणाल्याचे ते म्हणाले.