विंचूर,दि.(22) येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावरील तीनपाटी येथे प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे कडाक्याच्या उन्हामुळे प्रचंड हाल होत असून येथे निवारा शेडची मागणी होत आहे.येथील तीनपाटी भागात औरंगाबाद,येवला, नाशिक येथे प्रवास करण्य़ासाठी मोठ्या संख्येने प्रवासी बसची वाट पहात उभे रहात असतात. मात्र येथील तीनपाटीवर प्रवासी शेड नसल्याने प्रवाशांना कडक उन्हात बसची वाट पहावी लागत आहे. उन्हाळ्यासह पावसाळ्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. विंचूरसह परिसरातील गावांमधील नागरिक प्रवास करताना लक्ष्मी मार्केटसमोरील नव्या बसस्थानकासमोर न थांबता नाशिक औरंगाबाद महामार्गावरील तीनपाटी थांब्यावर बसची वाट पहात असतात. मात्र तीनपाटीवर निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. तीन वर्षांपूवी खासगी कंपनीने येथे पत्र्याचे निवारा शेड दिले मात्र ते लासलगाव रसत्यालगत अडगळीत ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा उपयोग होत नसल्याने तीनपाटी भागात निवारा शेडची मागणी होत आहे.
विंचूर तीनपाटी येथे निवारा शेडची मागणी
By admin | Updated: May 22, 2016 23:55 IST