पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समिती समोर गतिरोधक बसविण्याची मागणी पिंपळगाव युवा सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.पिंपळगाव बसवंत नाफेड बाजार समितीसमोर रोज होणारे अपघात लक्षात घेता तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी नाशिक जिल्हा युवा सेनेने केली असून, बाजार समिती समोर पीएनएस टोल प्लाझाने लवकरात लवकर गतिरोधक बसविणे अन्यथा आंदोलनाचा इशारा या निवेदनातून दिला आहे. टोल प्रशासनाचे बांधकाम विभागाचे राऊत यांनी दोन दिवसांत या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)----पिंपळगाव बसवंत बाजार समिती समोर गतिरोधक बसविण्याचे टोल प्रशासनाला निवेदन देताना आश्विन पाटील, गागरे, कृष्णा पेखळे, सह युवासेनेचे पदाधिकारी.
बाजार समिती समोर गतिरोधकाची मागणी
By admin | Updated: March 21, 2015 00:01 IST