देवळा- पोलिस पाटील पदाची रिक्तपदे भरतांना पोलिस पाटलांच्या वारसांना शासननिर्णयानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावा. ा वारसांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा नाशिक जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष माधवराव पगार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, पोलिस पाटील भरती संदर्भात वरिष्ठ अधिकारी जाचक अटी घालून पोलिस पाटील वारसांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेवानिवृत्त पोलिस पाटलांनी यापूर्वी तुटपुंज्या मानधनावर काम केले आहे. त्यांच्या वारसांना थेेट पोलिस पाटील पदासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)----
रिक्तपदे भरतीना पोलिस पाटलांच्या वारसांना प्राधान्य देण्याची मागणी
By admin | Updated: April 15, 2016 22:49 IST