शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

डिझेल टॅक्सी बंदीसाठी मुदत हवी

By admin | Updated: May 4, 2016 02:02 IST

दिल्लीत डिझेल टॅक्सी बंद झाल्यामुळे दिल्लीकरांचे हाल सुरू असतानाच, टॅक्सीचालकांनी सलग दुसऱ्या दिवशीही रस्ते रोखून धरले. त्यामुळे दिल्लीत वाहतूक ठप्प झाली.

नवी दिल्ली : दिल्लीत डिझेल टॅक्सी बंद झाल्यामुळे दिल्लीकरांचे हाल सुरू असतानाच, टॅक्सीचालकांनी सलग दुसऱ्या दिवशीही रस्ते रोखून धरले. त्यामुळे दिल्लीत वाहतूक ठप्प झाली.याची दखल घेत डिझेल टॅक्सीवर बंदी लागू करण्यासाठी मुदत देण्याची विनंती दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. या याचिकेत डिझेल टॅक्सीवर आणलेल्या बंदीमुळे निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच लोकांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे. भाजपानेही हा मुद्दा लोकसभेत लावून धरत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्या. एफ.एम.आय. कलीफुल्ला यांनी बंदी कधी लागू केली जाणार त्याबाबतचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले आहेत. बंदीमुळे निश्चितच लोकांची गैरसोय होणार आहे. बंदीबाबत काही सूचना किंवा शिफारशी सादर केल्या जात असतील तर बुधवारी त्यावर सुनावणी केली जाईल, असे खंडपीठाने म्हटले. (वृत्तसंस्था)सुमारे ३० हजार डिझेल टॅक्सी थांबल्या...सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिल्लीत सुमारे ३० हजार डिझेल टॅक्सी धावत नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दिल्ली सरकार प्रदूषण नियंत्रणासाठी कटिबद्ध असून न्यायालयाच्या आदेशाला विरोध केलेला नाही, मात्र अचानक निर्णय घेतल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे ज्येष्ठ वकील चंदर उदयसिंग यांनी स्पष्ट केले.दिल्लीकर वैतागले... कॅबचालकांच्या आंदोलनामुळे दिल्लीकरांना मंगळवारी दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा फटका बसला. आंदोलकांनी नोएडा आणि गुरगाव शहरांना जोडणारे रस्ते अडवून धरले. सकाळी कार्यालयांमध्ये जाणाऱ्यांना ‘ट्रॅफिक जाम’च्या वैतागाला सामोरे जावे लागले. त्यातच उन्हाचाही तडाखा वाढत होता.