विभागीय चौकशीची मागणी
By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST
जळगाव: मनपातील तत्कालीन आस्थापना अधीक्षक डी.के.कुंवर यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे. कुंवर यांच्याच विभागातील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी चिंचोले यांचे बचाव साक्षीदार म्हणून साक्ष नोंदविणे म्हणजे दोषातून वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
विभागीय चौकशीची मागणी
जळगाव: मनपातील तत्कालीन आस्थापना अधीक्षक डी.के.कुंवर यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे. कुंवर यांच्याच विभागातील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी चिंचोले यांचे बचाव साक्षीदार म्हणून साक्ष नोंदविणे म्हणजे दोषातून वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.पत्रकार संघाची बैठकजळगाव : जिल्हा पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक होणार असल्याने त्यासाठी पदाधिकारी व विश्वस्त मंडळाची बैठक सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकारांची बैठक होणार आहे.नेहरु जयंती साजरीजळगाव: शारदा माध्यमिक विद्यालयात शनिवारी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी दीपक पाटील, संगिता पाचपांडे, संजय घुगे, मनिषा झांबरे,संजय सपकाळे, नितीन तरुण, लक्ष्मण जाधव, हेमचंद्र इंगळे आदी उपस्थित होते.