शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात हवी गोहत्या बंदी, सरसंघचालकांची मागणी

By admin | Updated: April 9, 2017 18:17 IST

गोहत्येविरोधात देशभरात एक कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - गोहत्येविरोधात देशभरात एक कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. गोरक्षण झाले पाहिजे मात्र, त्यासाठी होणारा हिंसाचार चुकीचा असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.  
 
देशभरात गोहत्या थांबवणारा कायदा आम्हाला हवा आहे, कायद्याचं पालन करून गायींचं रक्षण करावं असं ते म्हणाले.  राजस्थानमधील अलवारमध्ये कथित गोसंरक्षकांकडून ५५ वर्षीय डेअरी व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर भाजप आणि संघावर देशभरातून टीकेची झोड उठवण्यात आली होती.याच पार्श्वभूमीवर गोसंरक्षण करताना कायदा पाळण्याची गरज व्यक्त केली. 
 
महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालकांनी गो-रक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसेचा विरोध केला. गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसेमुळे इतरांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले जात आहे. अनेक राज्यांमध्ये संघाची पार्श्वभूमी असलेले लोक सत्तेवर आहेत. त्याठिकाणी गो-रक्षणासाठी कायदे बनवण्यात आले आहेत. गो-रक्षणाचे काम हिंसेमुळे बदनाम होत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
 
 ईशान्य भारत आणि केरळसारख्या राज्यांमधील भाजपाचे नेते बीफ खाण्याचं समर्थन करत असल्याने भाजपा दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.