शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

ग्रामस्थांच्या गैरहजेरीमुळे प्रभाग सभा रद्द चौकशीची मागणी : विस्तार अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

By admin | Updated: March 24, 2015 23:35 IST

मांडवड : अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा व उदासीनतेमुळे जनतेसाठी असणार्‍या चांगल्या उपक्रमांची कशी वाट लावली जाते याचा अनुभव मंगळवारी (दि. २४) आयोजित करण्यात आलेल्या भालूर गटातील प्रभाग समितीच्या बैठकीच्या निमित्ताने जनतेस व लोकप्रतिनिधींना आला. एरव्ही अनेकवेळा अधिकारी नसल्याने ग्रामसभा, आमसभा, प्रभागसभा तहकूब करण्यात आल्याचे प्रकार अनेकवेळा घडल्याचे ऐकण्यास मिळतेे; परंतु मंगळवारी भालूर येथे प्रभाग सभेत अधिकारी हजर मात्र ग्रामस्थच गैरहजर राहिल्याने सभा तहकूब करावी लागल्याची घटना घडली.

मांडवड : अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा व उदासीनतेमुळे जनतेसाठी असणार्‍या चांगल्या उपक्रमांची कशी वाट लावली जाते याचा अनुभव मंगळवारी (दि. २४) आयोजित करण्यात आलेल्या भालूर गटातील प्रभाग समितीच्या बैठकीच्या निमित्ताने जनतेस व लोकप्रतिनिधींना आला. एरव्ही अनेकवेळा अधिकारी नसल्याने ग्रामसभा, आमसभा, प्रभागसभा तहकूब करण्यात आल्याचे प्रकार अनेकवेळा घडल्याचे ऐकण्यास मिळतेे; परंतु मंगळवारी भालूर येथे प्रभाग सभेत अधिकारी हजर मात्र ग्रामस्थच गैरहजर राहिल्याने सभा तहकूब करावी लागल्याची घटना घडली.नांदगाव तालुक्यातील भालूर जिल्हा परिषद गटाचे जि. प. सदस्य अशोक जाधव यांनी आपल्या गटाची प्रभाग समितीची सभा दि. २४ मार्च रोजी भालूर येथे आयोजित केलेली होती. त्यासाठी नियोजित सभेच्या अध्यक्षांसह तालुक्यातील सर्वच विभागाचे अधिकारी वेळेवर हजर झाले; मात्र या जिल्हा परिषद गटात एकूण ३६ महसूल गावांचा समावेश असतानाही या सभेसाठी केवळ दहाच नागरिक उपस्थित होते. तरीही अधिकार्‍यांनी सभा घेण्याचे ठरविले; परंतु भालूर येथील शिवसेनेचे शिवाजी ढगे व लक्ष्मीनगरचे बापुसाहेब जाधव यांनी सभेस पुरेसे नागरिक उपस्थित नसल्याचा सवाल करीत सदरची सभा तहकूब करण्याची मागणी केली.प्रभाग समितीची सभा आयोजित केलेली असल्याची माहिती गटातील नागरिकांना देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची जनजागृती झालेली नसल्याची बाब सभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून देत सभा रद्द करण्याची त्यांनी मागणी केली.सभेचे सचिव विस्तार अधिकारी ढवळे यांनी एकवेळी ग्रामसेवकांना सभेबाबत सुचित केल्याने कोणत्याही ग्रामसेवकांनी जनजागृती गावात करू शकले नाही हे निदर्शनास आले. या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभाग समितीच्या बैठकीचा फज्जा उडविण्यास केवळ विस्तार अधिकारी ढवळे हे जबाबदार असल्याने तीव्र संताप व्यक्त करून सभा तहकूब करण्यात आली. व तालुकास्तरावरून आलेला अधिकार्‍यांचा फौजफाट्यासह लोकप्रतिनिधींना ही आल्या पावली परत जाण्याची नामुष्की पत्करावी लागली. (वार्ताहर)----चौकटया विभागाचे विस्तार अधिकारी ढवळे यांच्या अकार्यक्षमेतमुळेच आजची प्रभाग समितीची सभा तहकूब करावी लागल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला असून, याची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येऊन आज तहकूब करण्यात आलेली सभा पुढील आठवड्यात संपूर्ण जणजागृती करून घेण्यात येईल. अशोक जाधव जिल्हा परिषद भालूर गट, अध्यक्ष प्रभाग समिती.