शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरून येणार्‍यांचा विमा उतरवा आयुक्तांना निवेदन: अश्विनी देशमुख यांची मागणी

By admin | Updated: August 10, 2016 22:03 IST

जळगाव : शिवाजीनगर उड्डाण पुलावरून ये-जा करणारे पादचारी, वाहनधाकर तसेच पुलानजीक रहाणार्‍या कुटुंबांचा प्रत्येक २५ लाखांचा विमा महापालिकेने उतरवावा अशी मागणी करणारे निवेदन नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

जळगाव : शिवाजीनगर उड्डाण पुलावरून ये-जा करणारे पादचारी, वाहनधाकर तसेच पुलानजीक रहाणार्‍या कुटुंबांचा प्रत्येक २५ लाखांचा विमा महापालिकेने उतरवावा अशी मागणी करणारे निवेदन नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जीर्ण झालेल्या शिवाजीनगरकडे जाणारा रेल्वे उड्डाण पूल अतिशय जीर्ण झाला आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने मनपास वेळोवेळी पत्रही दिले आहे. या पुलाच्या खालून अनेक मालवाहू गाड्या तसेच प्रवासी वाहतूक करणार्‍या एक्सप्रेस गाड्या ये-जा करत असतात. शिवाजी नगर व परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये शेकडो लोक रहात असतात. येणार्‍या जाणार्‍यांमध्ये हजारो शालेय विद्यार्थीही आहेत. पुलाची अवस्था पाहून नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे मात्र पर्याय नसल्याने त्याचा वापर केला जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पूल वापरास बंद करावा व नागरिकांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अन्यथा या पुलावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनधारक तसेच पुलाच्या नजीक राहणारी रहिवासी यांचा प्रत्येकी २५ लाखांचा विमा महापालिकेने उतरवावा अशी मागणी अश्विीन देशमुख यांनी केली आहे.