चंदीगड/जालंधर : हरियाणातील सिरसा येथे असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख संत गुरुमीत राम रहीम सिंग यांच्यावर तयार केलेला ‘मेसेंजर आॅफ गॉड’ हा चित्रपट शीख बांधवांच्या धार्मिक भावनांना दुखावणारा असल्याने त्याच्यावर बंदी घातली जावी अशी मागणी उत्तर भारतात अनेक ठिकाणांहून केली जात आहे. चंदीगड येथे भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या विद्यार्थी शाखेने येथे निदर्शने केली व पुतळ््याचे दहन केले. हिसारमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याला कठोर विरोध केला जाईल असा इशारा येथील संघटनांनी प्रसासनाला दिला आहे. पंजाब फिल्म वितरक संघटनेचे प्रवक्ते राजेश तालिब यांनी, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मान्यता दिली असून काही तांत्रिक कारणामुळे हा जालंधरसह अन्य भागात प्रदर्शित होऊ शकणार नाही असे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)