नवी दिल्ली : अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक तडाखा उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा व महाराष्ट्र या राज्यांना बसला असून निसर्गाच्या या उत्पाताखाली भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या राज्यांनी १०,१०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे, असे आज लोकसभेत सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यात पाऊस व गारपिटीमुळे १४ राज्यांतील ९४ लाख हेक्टर जमिनीतील पीक बाधित झाले आहे, असे कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी सांगितले. महाराष्ट्रात पाऊस व गारपिटीमुळे ९.८९ लाख हेक्टर जमिनीवरील पीक नष्ट झाले आहे. अनेक राज्यांना राज्य सरकारच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत घ्यावी, असे सांगण्यात आले आहे, असेही सिंग यावेळी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत देण्याची मागणी
By admin | Updated: April 22, 2015 02:47 IST