शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

दिल्लीचे लोकायुक्तपद दोन वर्षांपासून रिक्त

By admin | Updated: July 6, 2015 23:17 IST

भ्रष्टाचाराविरुद्ध जनलोकपाल आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर २०१३ पासून रिक्त असलेले लोकायुक्तांचे पद भरलेले नाही.

नवी दिल्ली : एकेकाळी भ्रष्टाचाराविरुद्ध जनलोकपाल आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर २०१३ पासून रिक्त असलेले लोकायुक्तांचे पद भरलेले नाही, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रारही या पक्षाने केली.दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी सार्वमत घेण्याची भाषा आपने चालविल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी जोरदार हल्लाबोल केला. आम आदमी पार्टीने सरकार सोडून द्यावे आम्ही त्यांना सध्याच्याच घटनात्मक चौकटीत प्रशासन कसे चालवायचे ते दाखवून देऊ, या शब्दांत त्यांनी केजरीवालांना आव्हानही दिले. केजरीवाल आमदारांची वेतनवाढ, सरकारच्या प्रचारासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यासारख्या मुद्यांवर ते सार्वमत का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.नोव्हेंबर २०१३ पासून लोकायुक्तांचे पद रिक्त आहे. दुर्दैवी बाब म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून दिल्लीत केजरीवालांचे सरकार आहे. जनलोकपालांबद्दल बोलणारा हा पक्ष सत्तेत असताना लोकायुक्त आणि लोकपाल कुठेच दिसत नाही, अशी घणाघाती टीका करीत काँग्रेसने आज दिल्लीत आंदोलनही केले.विधानसभेचे दोन सत्र आटोपले आहे. लोकायुक्त कायदा आणण्याचे कोणतेच संकेत नाही. गेल्यावेळी आपने ४९ दिवस सरकार चालविले तेव्हा केजरीवालांना जनलोकपाल कायदा आणू दिला नाही म्हणून राजीनामा दिला होता. आता दीडशे दिवस उलटले आहेत. लोकपाल कुठे आहे? जुन्या लोकायुक्तांचेच पद भरलेले नाही, असे माकन यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था) ——————————————रिकाम्या खुर्चीसमोर सांकेतिक अर्जदरम्यान, माकन यांनी लोकायुक्तांच्या रिक्त खुर्चीसमोर आम आदमीच्या पार्टीच्या आमदारांविरुद्ध सांकेतिक अर्ज दाखल करीत निषेध नोंदविला. आम्ही रिक्त खुर्चीसमोरच सांकेतिक अर्ज दाखल केला आहे. केजरीवालजी तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्तांबद्दल खूप बोलले आहेत, ते कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. दिल्ली सरकारने जाहिरातींवर खर्चाची तरतूद २४ कोटी रुपयांवरून ५२६ कोटी रुपयांवर नेली आहे, त्यावेळी आणि आपच्या कार्यकर्त्यांना सरकारी नोकऱ्या देताना त्यांनी सार्वमत मागितले काय? केवळ भांडणे लावण्यासाठी त्यांना सार्वमत हवे आहे, असेही माकन म्हणाले.