शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या स्थितीवरून दिल्लीचे वातावरण गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 03:22 IST

जम्मू-काश्मिरात भाजप- पीडीपीच्या सरकारची पुनर्स्थापना होऊन अवघे काही दिवस झाले असताना राजधानी दिल्लीत राजकीय जंग सुरू झाली आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष

-  शीलेश शर्मा,  नवी दिल्ली

जम्मू-काश्मिरात भाजप- पीडीपीच्या सरकारची पुनर्स्थापना होऊन अवघे काही दिवस झाले असताना राजधानी दिल्लीत राजकीय जंग सुरू झाली आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट होऊन हल्ला करताना भाजपा निरुत्तर बनली आहे.येत्या काळात जम्मू-काश्मीरचा मुद्दा विरोधी पक्षांसाठी मोठे राजकीय शस्त्र सिद्ध होणारे असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने शुक्रवारी दिले आहेत. या राज्यातील परिस्थितीवर करडी नजर ठेवावी अशी विनंती माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी राज्यपालांना केली आहे. राज्यपालांच्या अहवालावरच राष्ट्रपती राजवटीसंबंधी कलम ३५६ चा वापर केला जातो. राज्यपालांनी या कलमाचा पुन्हा वापर करण्यासाठी मानसिकरीत्या तयार राहावे याकरिता काँग्रेसने विरोधकांची एकजूट चालविली आहे. जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याकडे कॉंग्रेसने लक्ष वेधण्याचा चालविलेला प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे.एनआयटीचे १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी घरी परतले...श्रीनगर एनआयटीमधील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची निंदा करताना तिवारी म्हणाले की, परिस्थिती एवढी बिघडली आहे की मोठ्या संख्येने विद्यार्थी घरी परतत आहेत. आतापर्यंत काश्मीरबाह्ण १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घरचा मार्ग धरला असल्याची आकडेवारीही त्यांनी विविध वृत्तांच्या आधारे दिली आहे. दुसरीकडे राज्य सरकार आणि मानव संसाधान मंत्रालय गाढ झोपेत असून कोणतीही चिंता दिसत नाहीय. हे एक संवदेनशील राज्य असून पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्यामुळे त्याचे वेगळे महत्त्व आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.जेडीयू, डाव्या पक्षांसह संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजूट होत आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. या पक्षाचे नेते के.सी. त्यागी यांनी या राज्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. डाव्या पक्षांनी उत्तर काश्मिरातील बिघडत्या परिस्थितीवर थेट मोदींवर शरसंधान केले आहे. हंदवाडामध्ये संचारबंदी लागली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. कोणताही धोका निर्माण होण्याआधी राज्यपालांनी केंद्र सरकारला सतर्क करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.