शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा रॉबिनहूड! श्रीमंतांकडे चोरी करून करायचा गरिबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 17:57 IST

श्रीमंतांकडे चोरी करून गोरगरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडविषयी तुम्ही ऐकलंच असेल. पण असाच अजब चोर दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे.

ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. १८ - श्रीमंतांकडे चोरी करून गोरगरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडविषयी तुम्ही ऐकलंच असेल. पण असाच अजब चोर दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. स्वत:ला दिल्लीचा रॉबिनहूड समजणारा  हा चोर रात्री श्रीमंतांच्या घरी जाऊन मौल्यवान ऐवज रोख रक्कम चोरायचा आणि नंतर बिहारमधील आपल्या गावी जाऊन गोरगरिबांना मदत करायचा. या चोराने अनेक गरिबांना लग्नासाठी पैसे दिल्याचेही समोर आले आहे.  
 दक्षिण पूर्व दिल्लीडे डीसीपी रोमिल बनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "इरफान उर्फ उजाला ऊर्फ आर्यन (२७)  हा युवक दिल्लीत राहायचा. त्याने गेल्या काही महिन्यात दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलोनी, जामिया नगर आणि लाजपतनगर भागात १२ हून अधिक चोऱ्या केल्या आहेत. न्यू फ्रेंड्स कॉलनीतील राजीव खन्ना यांच्या घरीसुद्धा चोरीची अशीच घटना घडली होती. त्या चोरीचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती दिसली. त्या चेहऱ्याचा शोध घेत पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन एका चोराला ताब्यात घेतले." अधिक वाचा 
ऐशोआरामासाठी राष्ट्रीय कराटेपटू बनला दुचाकी चोर ! )(ट्राफिकमध्ये अडकल्याने BMW रस्त्यावर सोडून चोर फरार )(हाय-प्रोफाइल बाइकचोर अटकेत )मात्र स्थानिक रहिवाशांनी सदर तरुण चोर नसून समाजसेवक असल्याचे सांगितल्यावर पोलिसांना धक्का बसला. दरम्यान, इरफानकडून चोरीचा माल खरेदी करणाऱ्या धर्मेंद्र यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 
इरफान चोरीच्या मालातून येणाऱ्या रकमेतून गावात वैद्यकीय शिबीर, गरिबांना मदत अशी सामाजिक कार्येही करायचा. त्यामुळे काही लोक त्याला रॉबिनहूड म्हणूनही संबोधू लागले होते. आरोपी इरफान हा गोरगरिबांना मदत करण्याबरोबरच चोरीच्या पैशांमधून अय्याशी करत असल्याचेही उघड झाले आहे.  त्याने दिल्लीतील एका बारमध्ये आवडीचे गाणे ऐकण्यासाठी १० हजार रुपयांची ऑफर दिली होती. तसेच बाजारात येणाऱ्या नव्या कारपैकी आलिशान कारही त्याच्याकडे असायच्या.