शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:26 IST

Delhi Red Fort Blast Update: लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर एलएनजेपी रुग्णालयाबाहेर मंगळवारी पहाटेपासूनच अश्रूंनी भरलेले डोळे अन् मनात असलेले कुटुंबीय यांच्या प्रतीक्षेत दिसत होते. रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा कडक होती, पण त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या शेकडो कुटुंबीयांची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल, अशी स्थिती होती. 

नवी दिल्ली -  लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर एलएनजेपी रुग्णालयाबाहेर मंगळवारी पहाटेपासूनच अश्रूंनी भरलेले डोळे अन् मनात असलेले कुटुंबीय यांच्या प्रतीक्षेत दिसत होते. रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा कडक होती, पण त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या शेकडो कुटुंबीयांची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल, अशी स्थिती होती. काहींनी हातात फोटो धरले होते, काही फोनकडे नजरा टाकत होते. एकच प्रश्न होता... “आमचा माणूस कुठे आहे?” स्फोटातील मृतदेहांचे तुकडे, आतडे बाहेर आलेली शरीरे पाहून शवागृहातील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले होते. 

कालच चहा पित होतो... : नौमान नावाचा तरुण यात ठार झाला. त्याचे कुटुंब सकाळी शव ओळखल्यानंतर शांतपणे ॲम्ब्युलन्सच्या मागे चालत होते. नौमानचा मित्र सोनू शवागृहाबाहेर बसला होता. आत जाण्याची त्याची हिंमतच झाली नाही. “कालच आम्ही चहा पित होतो, आज मला त्याला तुकड्यांमध्ये पाहायला सांगताहेत...” एवढंच तो म्हणू शकला. 

‘जिवंत आहे की नाही?’ एका महिलेनं रडत रडत सांगितले, “आम्ही रात्रीपासून आहोत. एक शब्द तरी सांगा, जिवंत आहे की नाही...” आत रुग्णालयात डॉक्टर जखमींची काळजी घेत होते, तर बाहेर प्रतीक्षा, व्याकुळता आणि आशा-निराशेच्या गर्तेत सापडलेली कुटुंबे होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Red Fort Blast: Yesterday Laughing, Today Identifying Body Parts!

Web Summary : Families outside the hospital mourn loved ones lost in the Red Fort blast. A young man recalls having tea with a victim just yesterday. Desperate families await news, caught between hope and despair, seeking any information about their relatives.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट