शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे कायदामंत्री चार दिवस कस्टडीत!

By admin | Updated: June 10, 2015 03:31 IST

विधी शाखेची बोगस पदवी मिळवून फसवणूक आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपात दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक केली.

नवी दिल्ली : विधी शाखेची बोगस पदवी मिळवून फसवणूक आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपात दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक केली. पोलिसांनी तोमर यांना साकेत न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना चार दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जून रोजी होईल. दरम्यान, तोमर यांच्या अटकेमुळे नामुश्की ओढवलेल्या आम आदमी पार्टी सरकारने केंद्र सरकारवर लगेच हल्लाबोल केला. अटकेच्या कारवाईमुळे तोमर यांनी रात्री उशीरा पदाचा राजीनामा दिला.दिल्ली पोलिसांनी दिल्ली बार कौन्सिलच्या तक्रारीवरून सोमवारी तोमर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८ आणि १२० बी अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मंगळवारी तोमर यांना अटक करण्यात आली. तोमर यांच्या अटकेवरून आम आदमी पार्टी सरकारने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. सत्तेत बसलेले सर्व भ्रष्टाचारी लोक एकजूट झाले आहेत आणि मोदी सरकार दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करीत आहे, असा स्पष्ट आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. आप सरकारने सोमवारीच सीएनजी फिटनेस घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते, हे येथे उल्लेखनीय आहे. दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात सरकारच्या अधिकारावरून ‘जंग’ सुरू असतानाच तोमर यांना अटक करण्यात आली. त्यामुळे दिल्ली सरकार व नायब राज्यपालांमधील या लढाईला वेगळी कलाटणी मिळाली आहे. 

सोमवारी रात्री तोमर यांच्याविरुद्ध हौजखास पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तोमर यांना अटक करून आधी हौजखास पोलीस ठाण्यात आणि नंतर वसंतविहार पोलीस ठाण्यात नेले. तेथून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्यांची चार दिवसांच्या पोलीस कस्टडीत रवानगी केली. 3क् ते 4क् पोलिसांचा ताफा अटक करण्यासाठी आला त्यावेळी तोमर हे आपल्या त्रिनगर कार्यालयात लोकांशी बोलत होते. तोमर यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच अटक करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी म्हणाले. (प्रतिनिधी)
 
मोदी सरकारवर ‘आप’चा आरोप
तोमर यांची अटक पूर्णपणो घटनाबा आहे. ‘आप’ला धडा शिकविण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे. भ्रष्टाचारात सामील असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही. आम्ही भ्रष्टाचार करणा:यांविरुद्ध कठोर कारवाई केल्यामुळे मोदी सरकार आपल्या हुकूमशाहीच्या माध्यमातून दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा स्पष्ट आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.
 
पोलीस तोमर यांच्याशी एखाद्या माफियासारखे वागले. तोमर यांना ठाण्यात आणण्याआधी अटकेचे कारण न सांगता जबरदस्तीने त्यांना कारमध्ये बसविले आणि त्यांचे वाहनही जप्त केले. जणू माफिया असल्यासारखी त्यांना अटक करण्यात आली. ते काय पळून जाणार होते? की त्यांनी एखदा बॉम्ब पेरून ठेवला होता? एका घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला असताना अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती होती, की तोमर यांना अटक करावी लागली? त्यांच्या अटकेमागे मोठा कट आहे, असे सिसोदिया म्हणाले.
     
 
अटकेचा आदेश गृहमंत्रलयाचा नाही - राजनाथसिंग
जितेंद्रसिंग तोमर यांची अटक हा आपल्या मंत्रलयाने रचलेला कट असल्याचा आपने केलेला आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी फेटाळला. तोमर यांच्या अटकेचा आदेश गृहमंत्रलयाने दिलेला नाही. गृहमंत्रलय अशी कामे करीत नाही. कायदा आपले काम करीत आहे. त्यात गृहमंत्रलयाचा हस्तक्षेप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळी केली कारवाईपोलिसांनी मंगळवारी सकाळी त्रिनगरचे आमदार व पहिल्यांदाच मंत्री बनलेले ४९वर्षीय तोमर यांना अटक केली. तोमर यांनी बिहारच्या मुंगेर येथील इन्स्टिट्यूट आॅफ लीगल स्टडीज् कॉलेजमधून बनावट विधी पदवी मिळविल्याचा आरोप दिल्ली बार कौन्सिलने आपल्या तक्रारीत केला होता.