शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत", सौरभ भारद्वाज यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:46 IST

Delhi Elections 2025 : दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांवर आरोप केला आहे.

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशातच दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांवर आरोप केला आहे. दिल्ली पोलीस चिराग दिल्लीतील मतदान केंद्रावर लोकांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, "निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. बॅरिकेड्स का लावले आहेत? दिल्ली पोलिसांच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना बॅरिकेड्स लावण्यास सांगितले आहे? हे सर्व गरिबांना त्रास देण्यासाठी केले जात आहे. जिथे जिथे आपचा बालेकिल्ला आहे, तिथे मालवीय नगरचे एसीपी आणि एसएचओ हे सर्व उघडपणे करत आहेत."

याचबरोबर, "काल रात्री एसएचओने आमच्या खाजगी जागेवरही छापा टाकला. येथे २१,००० लोकांनी मतदान केले. चिराग दिल्लीतील सर्व १७-१८ मतदान केंद्रांवर पोलीस असे करत आहेत. लोक मतदान करण्यासाठी मेट्रोने किंवा रस्त्याने येऊ शकत नाहीत. वीरेंद्र सचदेवा किंवा राष्ट्रपती मुर्मू या मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर गाडीतून खाली उतरले का? कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत", असेही सौरभ भारद्वाज म्हणाले.

दरम्यान, सौरभ भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांना डीसीपी अंकित चौहान यांनी उत्तर दिले आहे. डीसीपी म्हणाले, "वृद्ध आणि ज्यांना चालता येत नाही, त्यांना सूट दिली आहे. त्यांना त्यांच्या गाड्या आत आणण्याची परवानगी आहे. हा नियम सर्वत्र अंमलात आणला जात आहे. ते (सौरभ भारद्वाज) ज्या ठिकाणी सांगत आहेत, त्या ठिकाणांची आम्ही चौकशी करू."

राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला शनिवारी जाहीर केला जाणार आहे. मतदान किती होते त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपdelhiदिल्ली