शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू नदीवर चीन बनवणार डायमर-भाषा धरण, पाकचा दावा

By admin | Updated: June 20, 2017 17:47 IST

चीन सिंधू नदीवर धरण बांधून देणार असल्याचा दावा आता पाकिस्ताननं केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - चीन आणि पाकिस्तानची मैत्री सर्वश्रुत आहे. भारतावर कुरघोडी करण्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानला पाठबळ देत असतो. चीन सिंधू नदीवर धरण बांधून देणार असल्याचा दावा आता पाकिस्ताननं केला आहे. चीन पाकिस्तानला बांधून देणारं धरण हे पाक-चीन आर्थिक कॉरिडोरचाच एक भाग असल्याचंही पाकिस्तानमधील रेडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. सिंधू नदीवर डायमर-भाषा धरण चीन बांधून देणार असल्याची माहिती पाकिस्तानातील नॅशनल असेंब्लीच्या एका समितीनं दिली आहे. गेल्या महिन्यातच पाकिस्तानमधले नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनीही रॉयटर या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी सिंधू नदीवरील धरणासाठी चीन आर्थिक मदत करेल, अशी पाकिस्तानला आशा आहे, असंही अहसान इक्बाल म्हणाले होते. सिंधू नदीवर डायमेर-भाषा धरण बांधण्यासाठी भारताचा विरोध असल्यामुळेच जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेनं निधी देण्यास नकार दिला आहे. डायमर-भाषा धरणाचा प्रोजेक्ट गिलगिट आणि बाल्टिस्तान भागात होणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी अमेरिकेनंही हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता. मात्र भारतानं जाहीर विरोध केल्यानंतर अमेरिकेनं काढता पाय घेतला. राज्य वीज उपयोगिता अध्यक्ष मुझिल हुसेन यांच्या मते, सद्यस्थितीत सीपीईसीमध्ये कोणताही हायड्रो-पॉवर प्रोजेक्ट समाविष्ट नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि चीननं डायमर-भाषा धरण बांधण्यासंदर्भात गांभीर्यानं विचार करण्यात काय हरकत आहे. दोन वर्षांपूर्वीच पाकिस्तानला या धरणासाठी जागतिक बँकेनं कर्ज देण्यास नकार दिला होता. कारण पाकिस्ताननं या प्रोजेक्टसाठी भारताकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलं नव्हतं.