शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट

By admin | Updated: July 19, 2014 02:23 IST

रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे.

नवी दिल्ली : रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. २०१०-११ मध्ये अशा अपघातांची संख्या ९३ होती ती २०११-१२ मध्ये ७७ तर २०१२-१३ मध्ये ६८ वर आली आहे. २०१३-१४ मध्ये मात्र त्यात किंचित वाढ होऊन ती ७१ झाली, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.गेल्या काही वर्षांत रेल्वेचे वारंवार अपघात झाल्याचे पाहता सुरक्षा अहवाल निष्प्रभ ठरले. छपरा येथे राजधानी एक्स्प्रेस घसरल्यानंतर गेल्या दोन वर्षांत किती अपघात झाले? रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय करण्यात आले, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. २०१२-१३ या वर्षी रेल्वे धडकण्याच्या ६ घटना घडल्या. याच श्रेणीतील अपघात २०१३-१४ या वर्षात ४ वर आले. यावर्षी ३० जूनपर्यंत केवळ एक घटना घडली आहे. २०१२-१३ मध्ये रेल्वे घसरल्यामुळे ४९ अपघात झाले. २०१३-१४ मध्ये अशा ५३ दुर्घटना झाल्या. यावर्षी जून ३० पर्यंत या दुर्घटनांची संख्या ३० आहे. गेटमन क्रॉसिंगवरील अपघात, रेल्वेतील आगीच्या घटना आणि अन्य किरकोळ दुर्घटनांची माहितीही त्यांनी दिली.२०१२-१३ या वर्षात अपघातांची संख्या १६ होती. त्याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी झाली. विभागीय समितीने अन्य ५२ अपघातांची चौकशी केली. २०१३-१४ या वर्षातील याच काळात अशा दोन्ही अपघातांची आकडेवारी ९ आणि ६२ होती. यावर्षी ३० जूनपर्यंत ही संख्या ४ आणि २२ एवढी होती. गेल्या दोन वर्षांत तसेच यावर्षी ३० जूनपर्यंत १६६ पैकी ११५ घटनांची चौकशी समितीने केली आहे. दोषी ३२६ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली. रेल्वेमध्ये आरपीएफ, जीआरपी तसेच जिल्हा पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा असते, असेही रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)