शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घोषित काळ्या पैशाची रक्कम ४१४७ कोटींवर

By admin | Updated: October 6, 2015 04:20 IST

सरकारने काळ्या पैशाबाबत स्वेच्छा कबुली देण्यासाठी (कॉम्प्लयान्स विंडो) घालून दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीत घोषित रकमेचा ४१४७ कोटी रुपयांचा सुधारित आकडा सरकारने

नवी दिल्ली : सरकारने काळ्या पैशाबाबत स्वेच्छा कबुली देण्यासाठी (कॉम्प्लयान्स विंडो) घालून दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीत घोषित रकमेचा ४१४७ कोटी रुपयांचा सुधारित आकडा सरकारने सोमवारी जारी केला. यापूर्वी ही रक्कम ३७७० कोटी रुपये असून ही आकडेवारी अंतिम नसल्याचे सरकारने नमूद केले होते, असे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात आणखी ६३८ कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता जाहीर झाल्यामुळे अंतिम आकडा वाढला. सरकारला त्यातून एकूण २४८८.२० कोटी रुपयांचा कर मिळणार आहे. यापूर्वी १ जून रोजी एकूण घोषणापत्रांची संख्या जाहीर करण्यात आली होती; मात्र मालमत्तेच्या अंतिम आकडेवारीची घोषणा केली नव्हती. विदेशी मालमत्ता स्वेच्छेने घोषित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. काळ्या पैशासंबंधी कठोर कायद्याच्या कचाट्यातून सुटका, तसेच ६० टक्के कर आणि दंड टाळण्यासाठी ९० दिवसांची सवलत देण्यात आली होती. संपत्ती घोषित करण्याचे टाळत ज्यांनी जोखीम पत्करली त्यांना परिणाम भोगावे लागतील. आम्ही कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे अधिया यांनी सांगितले. अमेरिकेसोबत विदेशी खाते कर पूर्तता कायद्यावर (एफएटीसीए)स्वाक्षरी झाली असल्यामुळे अमेरिकेतील मालमत्तेबाबत यापूर्वीच माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू झालीआहे. एचएसबीसी स्वीस खात्यातील ४३ नावांची माहिती मिळताच एकूण १३२ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत, असेही अधिया म्हणाले.५० पेक्षा जास्त देशांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. २०१७ पासून अनेक देश भारतीयांच्या खात्यांबाबत नियमित माहिती देणे सुरू करतील. कर टाळण्याचे किंवा कर चुकवेगिरीची प्रकरणे समोर आल्यास आम्ही दंड ठोठावणे, खटले दाखल करण्यासारखी कारवाई सुरू करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)