शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून 14 सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचा निर्णय

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

जिल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्य

जिल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्य
सोलापूर: सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीद्वारे 14 किंवा 15 सप्टेंबरला पाणी सोडले जाईल़ साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ सूक्ष्म नियोजन करुन मोहोळसाठी भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाल़े
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याबाबत मुंबईत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी बैठक बोलावली होती़ या बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ गणपतराव देशमुख, आ़ सुभाष देशमुख, आ़ दीपक साळुंखे, आ़ दिलीप सोपल, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, आ़ भारत भालके, आ़ बबनराव शिंदे, आ़ नारायण पाटील, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, ‘उजनी’चे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, ‘मनपा’चे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे आदी उपस्थित होत़े बर्‍याच दिवसांपासून विविध आमदारांकडून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला जात होता़
एनटीपीसीकडून उजनी ते आहेरवाडी अशी दुहेरी जलवाहिनी टाकण्यात येत आह़े ही योजना जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्यास याच जलवाहिनीद्वारे तूर्तास सोलापूरला पाणीपुरवठा करण्याचे देखील नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे म्हणाल़े सोलापूरला पाणी सोडल्यानंतर उजनी पाणीपातळी किती होईल, याचा सूक्ष्म विचार करुन नियोजन केले जात आह़े मोहोळसाठी पाणी सोडण्याबाबत देखील सकारात्मक विचार सुरू असून त्याचा निर्णय देखील दोन दिवसात घेतला जाईल, असे मुंढे म्हणाल़े नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर शहरावर येणारे जलसंकट तूर्तास तरी टळले आह़े महापालिकेने मात्र तातडीने समांतर जलवाहिनी करावी, 20 टीएमसी पाणी वाचल्यास शेतीसाठी हे पाणी वापरात येईल, असे मुंढे म्हणाल़े
चौकट़़़
मनपाने समांतर जलवाहिनी करावी
सोलापूर शहराला नदीतून वर्षातून चार पाळ्या सोडाव्या लागतात़ यासाठी सुमारे 20 टीएमसी पाणी वाया जात़े पाऊस न पडल्यास कदाचित नदीद्वारे सोलापूरला हे शेवटचे पाणी सोडणार आह़े महापालिकेने तातडीने उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी टाकावी़ समांतर जलवाहिनी न टाकल्यास यापुढे सध्या असलेल्या उजनी ते सोलापूर जलवाहिनीतून येणार्‍या 70 एमएलडी पाण्यावरच नियोजन कराव़े जलसंपदा मंत्री शिवतारे यांनी देखील जिल्हाधिकार्‍यांच्या या सूचना मनपाला बजावल्या आहेत़