शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव यांच्यासह सहा जणांचे तैलचित्र लागणार बाजार समितीचा निर्णय : लकी टेलर यांचा सेनेला पाठींबा

By admin | Updated: December 12, 2015 18:33 IST

जळगाव- बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, गुलाबराव देवकर आणि भिलाभाऊ सोनवणे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शनिवारी बाजार समितीच्या संचालकांनी मासिक बैठकीत घेतला.

जळगाव- बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, गुलाबराव देवकर आणि भिलाभाऊ सोनवणे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शनिवारी बाजार समितीच्या संचालकांनी मासिक बैठकीत घेतला.
सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी, प्रभाकर पवार, सिंधूबाई पाटील, सरला पाटील, विमलबाई भंगाळे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), अनिल भोळे, वसंत भालेराव, मनोहर पाटील, भरत पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

सेनेचे दोघे गैरहजर
बैठकीत शिवसेनेचे प्रभाकर सोनवणे, शशिकांत बियाणी अनुपस्थित होते. तसेच व्यापारी प्रतिनिधी नितीन बेहेडेदेखील अनुपस्थित राहीले.

सभापतींची विषय तहकूब करण्याची सूचना
आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्याचा विषय तहकूब ठेवा. नंतर तो घेऊ, अशी भूमिका सभापती नारखेडे व प्रभाकर पवार यांनी मांडली.

लकी टेलर, उपसभापतींचा नकार
आमदार पाटील यांचे तैलचित्र लावण्याचा विषय याच बैठकीत मंजूर करा. गुलाबराव यांचे तैलचित्र लागेलच, अशी भूमिका उपसभापती कैलास चौधरी व लकी टेलर यांनी मांडली. त्यास भरत बोरसे, सिंधूबाई पाटील, अनिल भोळे, भरत धनाजी पाटील, सरला पाटील यांनी पाठिंबा दिला. अर्थातच शिवसेनेच्या बाजूने लकी टेलर यांच्या पॅनलचे संचालक आल्याने भाजपाची मंडळी नरमली.

मग सुरेश भोळेंचे तैलचित्रही लावा
गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावायचे असेल तर आमदार भोळेंचे तैलचित्रही लावा, असे सभापती नारखेडे म्हणाले. त्यानंतर उपसभापती चौधरी यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही तैलचित्र लावा, अशी भूमिका मांडली. यातच आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, गुलाबराव देवकर व भिलाभाऊ सोनवणे यांचे तैलचित्र लावण्याचाही विषय आला. त्यास संचालकांनी मंजुरी दिली.
संग्रहालय व्हायला नको
बाजार समितीमध्ये ज्येष्ठ नेत्यांचे, विचारवंतांचेच तैलचित्र सभागृहात लागायला हवेत. असेच सुरू राहीले तर सभागृहाचे तैलचित्र होईल, असे प्रभाकर पवार म्हणाले.

खडसे, गुलाबराव यांचे तैलचित्र एकाच वेळी लागायला हवे होते
ज्येष्ठ संचालक भरत बोरसे म्हणाले, महसूलमंत्री खडसेंचे तैलचित्र लागले त्या वेळेस काहीच मुद्दा आला नाही. त्याच वेळी आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्रही लावायला हवे होतेे.

दंगा नियंत्रण पथक
सभा वादळी होईल, वाद होतील ही बाब लक्षात घेता बाजार समितीच्या आवारात दंगा नियंत्रण पथक बोलाविण्यात आले होते. १५ कर्मचारी त्यात होते. सभागृहानजीक चार कर्मचारी होते. २५ वर्षातप्रथमचपोलीसबंदोबस्तातबैठकहोतअसल्याचीप्रतिक्रियाजुन्यासंचालकांनीदिली.