शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फेसबूकवरील जिहादच्या पोस्टमुळे इसिसमध्ये जाण्याचा निर्णय - नजीम

By admin | Updated: April 28, 2017 03:27 IST

इसिसच्या म्होरक्या नजीम उर्फ उमर शमशाद अहमद शेख (२६) हा फेसबूक, सोशल मीडियावरील जिहादबाबतच्या पोस्ट, माहितीमुळे प्रभावित

मुंबई : इसिसच्या म्होरक्या नजीम उर्फ उमर शमशाद अहमद शेख (२६) हा फेसबूक, सोशल मीडियावरील जिहादबाबतच्या पोस्ट, माहितीमुळे प्रभावित झाल्याचे उत्तरप्रदेश एटीएसने त्याच्या केलेल्या चौकशीतून उघडकीस आले आहे. उत्तरप्रदेश एटीएस, महाराष्ट्र एटीएस, दिल्ली विशेष शाखा, आंध्रप्रदेश सीआय शाखेसह तब्बल नऊ पथकांनी पाच राज्यांमध्ये कारवाई करून मुंब्य्रातील नजीम याच्यासह उत्तरप्रदेशातील बिजनौर आणि पंजाबमधील लुधियानातून चार दहशतवाद्यांना १९ एप्रिलला बेड्या ठोकल्या. तसेच सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत तसेच गोळा केलेल्या पुराव्यानुसार इसिसचा म्होरक्या असलेल्या नजीम टोळीत नवीन सदस्य जोडणीचे, त्यांच्यासाठी पैसा उभा करणे, तरुणांची साखळी वाढविणे आदी कामे करत होता. सौदी अरेबीयातील दमाम येथे दोन वर्षे प्लंबरची नोकरी करून त्यानंतर तो भारतात परतला होता. त्यानंतर पुन्हा २०१५ मध्ये तो सौदी अरेबियातील हबाब मक्कामध्ये नोकरीसाठी गेला. तेथे दीड वर्षे राहिला. दरम्यानच्या काळात फेसबूक, अन्य सोशल नेटवर्र्किंग साईट्सवरील जिहादचे व्हीडिओ क्लीप, विविध पोस्टर पाहून तो प्रभावित झाला. यातूनच तोही त्यावर स्वत:ची मते मांडू लागला. याच दरम्यान त्याचा इसिससोबत संपर्क वाढला. आणि तो त्यांच्यासाठी काम करु लागल्याचे समोर आले आहे. हबाब मक्कामध्ये एक वर्ष वास्तव्याचा परवाना मिळाला असताना जास्त काळ राहिल्याने तेथील पोलिसांनी त्याला अटक केली. १८ दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर तेथील तपास यंत्रणांनी त्याला पुन्हा भारतात पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. (प्रतिनिधी)