शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरपासून दिल्ली-जयपूर फक्त साडेतीन तासांत

By admin | Updated: October 15, 2015 23:29 IST

गेल्या ३ वर्षांपासून अर्धवट नूतनीकरणाच्या विळख्यात अडकलेला दिल्ली जयपूर २२५ कि.मी.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीगेल्या ३ वर्षांपासून अर्धवट नूतनीकरणाच्या विळख्यात अडकलेला दिल्ली जयपूर २२५ कि.मी. अंतराचा ६ पदरी प्रशस्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८, डिसेंबर महिन्यात तयार होणार असून दोन्हीकडून अवघ्या साडे तीन तासात हे अंतर पार करता येईल.केंद्रीय भूतल परिवहन व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांच्या १00 प्रतिनिधींसह आयोजित दिल्ली जयपूर महामार्ग कामकाज पहाणी दौऱ्यात ही आश्वासक माहिती दिली. कोणत्याही सबबीविना महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, याचा तमाम यंत्रणांवर नैतिक दबाव तयार करण्यासाठी गडकरींनी हा अभिनव प्रयोग गुरूवारी केला. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गडकरींसह संयुक्तरित्या पत्रकार परिषदेलाही संबोधित केले. ५५ फ्लायओव्हर्स असलेल्या दिल्ली जयपूर सहा पदरी महामार्गाच्या २२५ कि.मी. अंतराच्या नूतनीकरणाचे काम २00८ सालच्या जून महिन्यात सुरू झाले. देशातल्या १३ बँकांनी या प्रकल्पाला वित्त पुरवठा मंजूर केला. अपेक्षेनुसार २0११ पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवे होते. प्रत्यक्षात २0१२ पर्यंत अवघे ६0 टक्के काम पूर्ण झाले. युपीए सरकारच्या अखेरच्या टप्प्यात ते कसेबसे ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. जागोजागचे भू संपादन, पर्यावरण व वन विभागाच्या मंजुऱ्या, आर्थिक अडचणी, आवश्यक सेवांचे स्थलांतर, दुतर्फा अतिक्रमणे दूर करणे, अशा विविध कारणांनी विविध टप्प्यांचे काम बंद पडले होते. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाला गडकरींच्या नेतृत्वाखाली नव्याने वेग देण्यात आला. आता ४ फ्लायओव्हर्स वगळता वर्षभरात १७ टक्के काम पूर्ण करीत एकुण प्रकल्पाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण करण्यात सरकारला यश आले आहे.कोटपुतलीच्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी नितीन गडकरींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दिल्ली जयपूर महामार्गाचे काम रखडल्यामुळे राजस्थानच्या विकासाची कशी कोंडी झाली होती, याचे वर्णन ऐकवतांना राजे म्हणाल्या, युपीएच्या कारकिर्दीत (सी.पी.जोशी यांचा नामोल्लेख न करता) भूतल परिवहन मंत्रिपदाचा कार्यभार खरं तर राजस्थानच्या प्रतिनिधींकडे होता. त्यांनी पुरेसे लक्ष न घातल्याने या कामाचा खोळंबा झाला. दिल्लीत मोतीलाल नेहरू प्लेस येथील गडकरी यांच्या निवासस्थानापासून २ लक्झरी बसेसव्दारा सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या विशेष दौऱ्यात स्वत: गडकरी दोन्ही बसेसमधे आळीपाळीने पत्रकारांसोबतच बसले. बसमधे माईकची खास व्यवस्था करण्यात आली होती.