शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी कर्जमाफीची आवश्यकता

By admin | Updated: February 1, 2017 01:19 IST

सरकारी बँकांची बुडित कर्जे व बड्या उद्योगांचा वाढता कर्जबाजारीपणा यातून लवकर मार्ग काढला नाही तर देशाच्या विकासाच्या गाड्यास खीळ बसू शकेल, असे प्रतिपादन

नवी दिल्ली : सरकारी बँकांची बुडित कर्जे व बड्या उद्योगांचा वाढता कर्जबाजारीपणा यातून लवकर मार्ग काढला नाही तर देशाच्या विकासाच्या गाड्यास खीळ बसू शकेल, असे प्रतिपादन करत आर्थिक सर्वेक्षण आहे. अहवालात बुडित कर्जे माफ करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.गेली काही वर्षे खासगी ‘अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या’ सुरु करून यातून मार्ग काढण्याचा झालेला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्यामुळे केंदाचे पाठबळ असलेली ‘ पब्लिक अ‍ॅसेट रिहॅबिलिटेशन एजन्सी’ (पीएआरए) संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव या सर्वेक्षणात आहे. बुडित कर्जांची मोठी व राजकीयदृष्ट्या प्रकरणे या संस्थेने हाताळावीत, असे सरकारला वाटते.सर्वेक्षण म्हणते की, बुडित कर्जे सरळसरळ माफ करून टाकली तर वशिलेबाजीचे आरोप होतील. कर्जे थकलेल्या कंपन्या सरकारने ताब्यात घेऊन त्या विकायला काढल्यास सरकार कठोरपणे वागत असल्याचे दूषण दिले जाईल.ज्यांच्याकडे सर्वाधिक कर्जे थकलेली आहेत अशा १०० खासगी उद्योगांपैकी ५७ टक्के कर्जदारांचा कर्जबाजारीपणा ७५ टक्क्यांहून अधिक कमी करावा लागेल. एकूण थकित कर्जांपैकी ४० टक्के कर्जे ज्यांनी दिली आहेत, अशा किमान १३ सरकारी बँकांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यांची २० टक्क्यांहून अधिक कर्जे वसूल न होण्याच्या स्थितीत आहेत. यातून यशस्वीपणे मार्ग काढण्याची गरज असल्याचे सरकार म्हणते.सद्यस्थिती देशाच्या आर्थिक सुदृढतेसाठी पोषक नाही. बुडित कर्जांतून बाहेर न पडल्यास आर्थिक विकासावर दुष्परिणाम होणे अपरिहार्य आहे. कर्जांचा मोठा बोजा असलेल्या कंपन्या नवी गुंतवणूक करताना हात आखडता घेत आहेत. ज्यांची कर्जे थकली आहेत त्या बँका नवी कर्जे देण्याचा धोका पत्करायला तयार नाहीत. सात वर्षांत खासगी क्षेत्राची भांडवली गुंतवणूक कमी होत गेली आहे व सरकारी गुंतवणुकीतही वाढ झालेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोजके बडे थकीत कर्जदारआर्थिक सर्वेक्षणानुसार बँकांच्या एकूण थकीत कर्जांपैकी ७१ टक्के कर्जे ५० कंपन्यांकडे थकली आहेत. यापैकी १० कंपन्यांची थकीत कर्जे ४० हजार कोटी रुपयांची आहेत. त्यामुळे ज्या कंपन्यांचे उत्पन्न व्याज चुकते करता येईल, एवढेही नाही, अशा कंपन्यांच्या कर्जांपैकी मोठा भाग माफ करावा लागेल, पण तपासी यंत्रणा फौजदारी कारवाई करतील, या भीतीने बँका हा निर्णय घ्यायला धजावत नाहीत.