कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
(फोटो)
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
(फोटो)कर्जबाजारी शेतक ऱ्याची आत्महत्याधामणगाव येथील घटना : विहिरीत घेतली उडीभिवापूर : सततची नापिकी, अतिवृष्टीचा फटका आणि वाढते कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना भिवापूर तालुक्यातील धामणगाव (विद्यामंदिर) येथे बुधवारी मध्यरात्री घडली असून, गुरुवारी सकाळी उघडकीस आली.मोहन वासुदेव राऊत (४२, रा. धामणगाव-विद्यामंदिर, ता. भिवापूर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. वासुदेव राऊत यांच्याकडे ४.१२ हेक्टर शेती आहे. त्यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टाका शाखेकडून एक लाख पाच हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. ते २००९ पासून थकीत आहे. शिवाय, त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथे घरातील सोन्याचांदीचे दागिने गहाण ठेवून पैशाची उचल केली होती. तसेच काही मित्र आणि नातेवाईकांकडूनही त्यांनी ५० हजार रुपये उसणे घेतले होते. गेल्या दोन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे त्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य झाले नाही. शिवाय, थकीत कर्जामुळे नो ड्यू सर्टिफिकेट न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या बँकांनी कर्जपुरवठा केला नाही. त्यातच त्यांनी यावर्षी उसणवारी करून पैसा गोळा केला आणि पेरणी केली. आधी पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. दुबार पेरणी केल्यानंतर सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव झाला. त्यातच १३ व २२ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे यांची शेती पिकासह खरडून गेली. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी व प्रपंच चालविण्यासाठी पैसे आणायचे कुुठून, याच विचारात ते गेल्या काही दिवसांपासून होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. याच विचारात असताना त्यांनी बुधवारी मध्यरात्री शेतातील विहिरीत उडी घेतली. त्यांच्यापश्चात पत्नी कल्पना व पायल (१५), प्राजक्ता (१३), सुहानी (११) या तीन मुली आहेत. (तालुका प्रतिनिधी)---------चौकट---तालुक्यातील दुसरी घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची ही भिवापूर तालुक्यातील दुसरी घटना होय. तालुक्यातील सरांडी येथील संजय रामचंद्र राऊत (२५) या तरुण शेतक ऱ्याने १६ ऑगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तालुक्यातील या शेतकरी आत्महत्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ***