रेल्वेच्या दरवाजातून तोल जावून पडल्याने तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: April 5, 2016 22:02 IST
जळगाव: रेल्वे प्रवासात दरवाजात बसला असताना तोल जावून खाली पडल्याने दिनानाथ साहू (वय २५ रा. अकोली, मध्यप्रदेश) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. शिरसोली ते दापोरा दापोरा रेल्वे पुलाजवळ खांब क्र.४०७/१ ते ४०७/३ दरम्यान साहू याचा मृतदेह आढळून आला होता. दुपारपर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर ही ओळख पटली. साहू हा पुणे येथे गवंडी काम करत होता. गावाकडे उत्सव असल्याने त्यासाठी तो घरी जात होता. पुणे-पटना एक्सप्रेसचे त्याचे तिकीट होते. गाडी गर्दी असल्यामुळे दरवाजाजवळच तो बसला होता.पहाटेच्या सुमारास तोल जावून खाली पडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्टेशन मास्तर विजय सिन्हा यांच्या माहितीवरुन तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेच्या दरवाजातून तोल जावून पडल्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव: रेल्वे प्रवासात दरवाजात बसला असताना तोल जावून खाली पडल्याने दिनानाथ साहू (वय २५ रा. अकोली, मध्यप्रदेश) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. शिरसोली ते दापोरा दापोरा रेल्वे पुलाजवळ खांब क्र.४०७/१ ते ४०७/३ दरम्यान साहू याचा मृतदेह आढळून आला होता. दुपारपर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर ही ओळख पटली. साहू हा पुणे येथे गवंडी काम करत होता. गावाकडे उत्सव असल्याने त्यासाठी तो घरी जात होता. पुणे-पटना एक्सप्रेसचे त्याचे तिकीट होते. गाडी गर्दी असल्यामुळे दरवाजाजवळच तो बसला होता.पहाटेच्या सुमारास तोल जावून खाली पडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्टेशन मास्तर विजय सिन्हा यांच्या माहितीवरुन तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(सुधारीत)