विजेचा धक्क्याने महिलेचा मृत्यू
By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST
विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
विजेचा धक्क्याने महिलेचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यूरामटेक : विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटगोवारी येथे गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. शीला राजेंद्र नाकतोडे (३५, रा. पटगोवारी, ता. रामटेक) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला घरी घरकाम करीत असताना नकळत तिचा स्पर्श विजेच्या तारेला झाला आणि तिला जोरदार धक्का लागला. त्यामुळे तिला लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***