शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तोयबाच्या कमांडरसह दोघांचा खात्मा

By admin | Updated: July 2, 2017 04:52 IST

गेल्या महिन्यात सहा पोलिसांना ठार मारणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करी याच्यासह दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी

श्रीनगर : गेल्या महिन्यात सहा पोलिसांना ठार मारणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करी याच्यासह दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी शनिवारी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एका आॅपरेशनमध्ये ठार मारले. पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्याच्या दियालगाम भागात बटपोरा गावात या मोहिमेत ताहिरा (४४) आणि शादाब अहमद चोपन (२१) या दोघांचा मृत्यू झाला. पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले की, चकमक संपली आहे. बशीर लश्करी आणि आझाद दादा अशी मृत अतिरेक्यांची नावे आहेत. गावातील एका घरात लपून बसलेला अतिरेकी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत ताहिरा यांचा मृत्यू झाला, तर घटनास्थळी आंदोलकांविरुद्ध सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत चोपन मारला गेल्याचे सांगण्यात आले. चोपन यास एसकेआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी जखमी झालेल्या चार जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या अचबल भागात १६ जून रोजी पोलीस ठाण्याचे प्रभारी फिरोज अहमद डार आणि अन्य पाच पोलिसांच्या हत्येत लश्करी आणि त्यांचा समूह सहभागी होता. अनंतनागच्या बटपोरा भागात लश्करीसह अन्य अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागाला घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली. पोलिसांनी सांगितले की, अतिरेक्यांनी १७ जणांचा मानवी ढाल म्हणून उपयोग केला. तथापि, ही मोहीम सुरू होण्यापूर्वी या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. १५ दिवसांतच बदला बशीर लश्करी हा लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक अतिरेकी म्हणून ओळखला जात होता. पोलीस अधिकारी फिरोज अहमद डार यांच्यासह सहा पोलिसांना मारणारा अतिरेकी हाच तो बशीर. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते की, शहीद झालेल्या सहा पोलिसांना न्याय मिळवून देऊ. या घटनेला १५ दिवस पूर्ण होत असतानाच शनिवारी सुरक्षा दलाने हे यशस्वी आॅपरेशन करत बशीरचा खात्मा केला. सुरक्षा दलाचे हे यश मानले जाते.