शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Updated: June 23, 2017 00:26 IST

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सहा तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

पुलवामा : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सहा तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. चकमकीनंतर स्थानिकांचा जमाव सुरक्षा दलांच्या दिशेने चाल करून येत होता. त्याला पांगविण्यासाठी केलेल्या कारवाईत एक नागरिकही ठार झाला. तौसिफ हसन वनी (२८) असे त्याचे नाव असून सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात तो नेहमीच पुढे असायचा, असे पोलिसांनी सांगितले. वनीविरुद्ध १० गुन्हे दाखल आहेत. २०१० आणि २०१६ मध्ये जनसुरक्षा कायद्याखालीही त्याला अटक करण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. काकापोरा भागातील एका घरात माजिद मीरसह तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्या घराला वेढा घातला. सुरक्षा दले आणि अतिरेक्यांत रात्री दहा वाजता चकमक सुरू झाली. मीरशिवाय शाहिद आणि इर्शाद अहमद या दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर पहाटे चार वाजता ती संपुष्टात आली. मीरने २०१६ मध्ये या दोघांची लष्कर-ए-तोयबात भरती केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवादी लपून बसलेल्या घराला चकमकीदरम्यान आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांना घराबाहेर पडावे लागले. पोलिसांनी त्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे जवानांनी त्यांना गोळ्या घातल्या. पुलवामाच्या या भागातील अलीकडची ही पहिलीच यशस्वी मोहीम आहे. दहशतवाद्यांचे येथे मोठे जाळे असून, स्थानिकांचाही त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून सुरक्षा दलांना येथे यश मिळत नव्हते. आजच्या मोहिमेमुळे लष्कर-ए-तोयबाला मोठा धक्का बसला आहे. अनंतनाग जिल्ह्याच्या अर्विन गावात १७ जून रोजीच्या चकमकीत लष्करचा स्वयंघोषित कमांडर जुनैद मट्टू आणि अन्य दोघे ठार झाले होते. चकमकीनंतर पोलिसांना आणखी एक लढाई लढावी लागली आणि यावेळी आव्हान होते रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांचे. निदर्शक सुरक्षा दलांच्या दिशेने दगडफेक करीत होते. पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासह पेलेट गनचा वापर केला. त्यात वनीचा मृत्यू झाला, तर अन्य ४० लोक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. मीरचा काकापोराचे माजी सरपंच फयाज अहमद आणि पीडीपीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी दार यांच्या हत्येत कथितरीत्या हात होता. खोऱ्यातील तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. लष्करच्या काश्मिरातील कारवायांचे संचालन करणारा पाकिस्तानी नागरिक अबू दुजाराचा तो निकटवर्तीय मानला जाई. तो दहशतवादी कमांडर होता.