शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तीन अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Updated: July 13, 2017 00:20 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवला

सुरेश डुग्गर । लोकमत न्यूज नेटवर्कश्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दिनचे तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांपैकी एका अतिरेक्याचा पोलीस अधिकारी आयुब पंडित यांच्या हत्येत समावेश होता. या घटनेनंतर बडगाममध्ये स्थानिक लोकांनी काश्मीरला स्वातंत्र्य हवे, अशा घोषणा दिल्या. बडगामच्या रुदवोडा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे मंगळवारी संध्याकाळपासून सुरक्ष दलांनी नाकेबंदी केली होती. अतिरेक्यांना पळून जाता येऊ नये, अशी व्यवस्थाच करण्यात आली होती. प्रत्येक घरात शिरून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना, अचानक सुरक्षा दलांवर गोळीबार झाला. पण अंधारामुळे ते कुठे लपले आहेत, याचा अंदाज घेता आला नाही. रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्यासाठी ते अधूनमधून सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळीबार करीतच होते. सकाळी पुन्हा दहशतवाद्यांचा बाहेर पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नात त्यांनी पुन्हा गोळीबार करताच, ते नेमके कुठे लपले आहेत, हे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षा दलांनीही गोळीबार करून, त्या तिघांचा खातमा केला. ते जिथे लपले होते, तिथे काही शस्त्रे आणि दारूगोळाही सापडला. ते तिघे हिजबुल मुजाहिद्दिनचे असून, मूळचे काश्मीरमधीलच आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)> निर्बंध जारीत्यातील साजिद गिरकर ठार झाल्याचे कळताच, बडगाम जिल्ह्याच्या मलरट्टा भागात तणाव निर्माण झाला. तिथे हिंसाचार होईल, अशी परिस्थिती होती. तो तेथील रहिवासी असल्याने बडगामच्या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत. त्याचा मृतदेह नंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याची दुपारी अंत्ययात्रा निघाली, त्यात हजारो लोक सहभागी झाले होते आणि ते काश्मीरला आझादी (स्वातंत्र्य) मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत होते. इतर दोघांचे मृतदेहही कुटुंबीयांकडे सोपविण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.