स्वाईन फ्लूूू मृत्यू जोड
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
हरियाणात स्वाईन फ्लूचे १५ बळी
स्वाईन फ्लूूू मृत्यू जोड
हरियाणात स्वाईन फ्लूचे १५ बळी चंदीगड : हरियाणात या वर्षी स्वाईन फ्लूने १५ जणांचा बळी घेतला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) राम निवास यांनी दिली. गेल्या १ जानेवारीपासून राज्यात विविध ठिकाणी स्वाईन फ्लूूमुळे १५ जण दगावले असून ११० जण रुग्णालयात उपचार घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.पंजाबातील मृत्युसंख्या २३ दरम्यान पंजाबमध्ये स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यातील स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही, असे या दोन्ही राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.