शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता पाक अधिका-याचा कुलभूषण यांच्या फाशीशी संबंध?

By admin | Updated: April 12, 2017 10:42 IST

पाकिस्तानी लष्करातील बेपत्ता निवृत्त लेफ्ट.कर्नल मोहम्मद हबीब झहीर यांचा संबंध भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशी शिक्षेसोबत असल्याचे म्हटले जात आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - नेपाळ-भारतीय सीमा परिसरातून बेपत्ता झालेले पाकिस्तानी लष्करातील निवृत्त लेफ्ट.कर्नल मोहम्मद हबीब झहीर यांचा संबंध भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशी शिक्षेसोबत असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, झहीर भारताच्या ताब्यात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. 
 
"इंडियन एक्स्प्रेस"च्या बातमीनुसार, कुलभूषण जाधव यांचे मार्च 2016मध्ये अपहरण करणा-या पथकात मोहम्मद हबीब झहीर याचाही समावेश होता. भारतीय यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून झहीरच्या मागावर होती. यानंतर झहीर नेपाळजवळच्या लुंबिनी येथे शेवटचा दिसला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
जाधव यांचा मागोवा घेणा-या पथकाचं नेतृत्व करणा-या झहीरला भारत-नेपाळ सीमेवर 3 एप्रिल रोजी अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
झहीर भारताच्या ताब्यात असल्याची माहिती मिळताच घाईघाईत पाकिस्ताननं जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याची घोषणा केली. 
 
कोण आहे  लेफ्ट.कर्नल मोहम्मद हबीब झहीर ?
पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, झहीर हा 2014 साली पाकिस्तान लष्करातून निवृत्त झाला. लष्करातून निवृत्त झाल्यानंतरही तो पाकिस्तानीची गुप्तचर संस्था ISI साठी काम करत होता. त्याच्या कारवायांमध्ये तो सहभागी होता. 
दरम्यान, 6 एप्रिलपासून झहीरबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गुरुवारी दुपारी त्याने कुटुंबीयांसोबत संपर्क साधला होता. झहीरच्या कुटुंबानं दावा केला आहे की 5 एप्रिलला एका कामानिमित्त तो नेपाळमध्ये गेला होता आणि त्याचवेळी लुंबिनीमध्ये भारतीय सीमेपासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावरुन तो गायब झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, पाकिस्ताननं झहीरच्या गायब होण्यामागे भारताचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 
 
(कुलभूषण जाधव यांना वाचवूच - राजनाथ सिंह)
दरम्यान, पाकिस्तानने हेरगिरीचा ठपका ठेवलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नव्हे तर व्यावसायिक व सर्वसामान्य भारतीय आहेत. पाकिस्तानने त्यांना सन्मानाने सोडायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करत जाधव यांच्या सुटकेसाठी सरकार म्हणून जे काही करता येईल ते सर्व करू. वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.