म्हसावद येथील एकाचा विषप्राशनाने मृत्यू
By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील एकाचा विषप्राशनाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
म्हसावद येथील एकाचा विषप्राशनाने मृत्यू
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील एकाचा विषप्राशनाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नशीर बशीर पठाण (वय ३५, रा.म्हसावद) असे त्या इसमाचे नाव आहे. नशीर पठाण यांनी २५ फेबु्रवारीला विषप्राशन केले होते. म्हणून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी सकाळी ९.४५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी दिलेल्या माहितीवरून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भादंवि कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.