शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

विमानतळावरच प्रवाशाचा मृत्यू; पीडित कुटुंबीयांस १२ लाख ₹ मोबदला देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:30 IST

चंद्रा शेट्टी हे त्यांची पत्नी सुमती आणि मुलगी दीक्षिता यांच्यासमवेत १९ नोव्हेंबर २०२१ रोजी मंगळुरूला जात होते

बंगळुरू  - विमान प्रवासात प्रवाशाच्या झालेल्या गैरसोयीबद्दल ग्राहक न्यायालयाने कंपनी आणि विमानतळ प्रशासनला चांगलंच फटकारलं आहे. तसेच, प्रवाशी ग्राहकाच्या बाजुने निर्णय देताना पीडित कुटुंबीयास १२ लाख रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत. या प्रवासात ६० वर्षीय प्रवाशाचा ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला होता. बंगळुरूतील केपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली होती. त्यावेळी, इंडिगो विमानसेवा आणि केआयएकडून वेळेत आणि आवश्यस सुविधा न मिळाल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला होता. त्यासंदर्भात, त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. 

चंद्रा शेट्टी हे त्यांची पत्नी सुमती आणि मुलगी दीक्षिता यांच्यासमवेत १९ नोव्हेंबर २०२१ रोजी मंगळुरूला जात होते. त्यावेळी, बंगळुरूच्या केपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानातून ते प्रवास करणार होते. मात्र, विमानतळावर चेक इन करताच चंद्रा शेट्टींना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यावेळी, त्यांच्या पत्नी आणि मुलीने संबंधित विमानतळ व इंडिगो कंपनीच्या स्टाफकडे मदतीसाठी याचना केली. तसेच, तात्काळ व्हील चेअर मिळावी, ज्यातून त्यांना रुग्णालयात दाखल करता येईल, अशी मागणीही केली. मात्र, कंपनी स्टाफ यांनी वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे, चंद्रा शेट्टींना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला व त्यामध्ये त्यांचे निधन झाले. 

यासंदर्भात सुमती आणि दीक्षिता शेट्टी यांनी प्रथम केपगौडा विमानतळावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, तिथे दखल न घेतल्यामुळे मार्च २०२२ मध्ये त्यांनी बंगळुरूच्या ग्रामीण ग्राहक न्यायलयात धाव घेतली. येथे इंडिगो कंपनीचे वकील आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. तसेच, ग्राहकांना आवश्यक ती सुविधा आणि अत्यावश्यक सेवा देणं ही कंपनीची जबाबदारी असून ती टाळता येणार नाही, असे नमूद केले. त्यानुसार, पीडित कुटंबीयांस नुकसान भरपाई म्हणून १२ लाख रुपयो मोबदला देण्याचे निर्देशही ग्राहक न्यायालयाने कंपनी व विमानतळ अथॉरिटीला दिले.  

टॅग्स :IndigoइंडिगोAirportविमानतळCourtन्यायालयconsumerग्राहक