शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या खांबावर चढलेल्या बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: July 4, 2017 09:47 IST

तेलंगणामध्ये विजेच्या खांबावर चढलेल्या एका बिबट्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 4 - तेलंगणामध्ये विजेच्या खांबावर चढलेल्या एका बिबट्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  निजामाबाद जिल्ह्यातील मल्लराम वनक्षेत्रामध्ये  ही घटना आहे.  मात्र, बिबट्या विजेच्या खांबावर नेमका चढलाच कसा? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.  सोमवारी (3 जुलै) ही घटना घडली आहे. 
 
याबाबत सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.  हा बिबट्या मानवी वसाहतीत शिरल्याची माहिती स्थानिकांनी तातडीनं वन अधिका-यांना दिली.  यानंतर हा बिबट्या विजेच्या खांबावर तारांमध्ये लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले. 
वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव येऊन बिबट्याला तारांवरून खाली उतरवले. पण त्यापूर्वीच हा बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.  
 
भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या शिकार पकडण्यासाठी खांबावर चढला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  मात्र, हा बिबट्या शहरी परिसरात कसा आला?, कोणत्या रस्त्याने आला?,  येथे कसा शिरला? या सर्व बाजूंनी प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचंही अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.  
 
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी पोहोचण्यापूर्वी घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकं मोठ्या प्रमाणात तेथे जमले होते.