शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी वादातील शेवटच्या पक्षकाराचे निधन

By admin | Updated: July 21, 2016 04:54 IST

अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिरावरून गेली ५६ वर्षे सुरु असलेल्या न्यायालयीन वादात मूळ दावा दाखल करणाऱ्या सुरुवातीच्या पक्षकारांपैकी हयात असलेले शेवटचे पक्षकार हाशिम अन्सारी यांचे बुधवारी निधन

लखनऊ : अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिरावरून गेली ५६ वर्षे सुरु असलेल्या न्यायालयीन वादात मूळ दावा दाखल करणाऱ्या सुरुवातीच्या पक्षकारांपैकी हयात असलेले शेवटचे पक्षकार हाशिम अन्सारी यांचे बुधवारी निधन झाले. अन्सारी ९५ वर्षांचे होते.अन्सारी वृद्धत्वाशी संबंधित व्याधींनी गेले अनेक दिवस अंथरुणाला खिळून होते. बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास अयोध्या येथील राहत्या घरात ते अल्लाला प्यारे झाले, असे इक्बाल या त्यांच्या मुलाने सांगितले. अब्बाजी नसले तरी त्यांनी सुरू केलेला न्यायालयीन लढा आपण पुढे चालवू, असे इक्बालने स्पष्ट केले.सन १९४९ मध्ये बाबरी मशिदीत भगवान श्री रामाची मूर्ती कथितपणे गुपचूप आणून ठेवण्यावरून निर्माण झालेल्या अशांततेच्या संदर्भात अन्सारी यांना अटक झाली आणि ते या वादाशी कायमचे जोडले गेले. वादग्रस्त बाबरी मशिदीतून अजान दिल्याबद्दल फैजाबाद न्यायालयाने १९५२ मध्ये त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली होती.आज उध्वस्त केली गेलेली बाबरी मशिद जेथे उभी होती व ज्याला हिंदू श्री रामाचे जन्मस्थान मानतात ती जागा मुस्लिमांची आहे की हिंदूंची याविषयीचा मूळ दिवाणी दावा सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डातर्फे ज्या सहा पक्षकारांनी १९६१ मध्ये फैजाबादच्या न्यायालयात दाखल केला. त्यात अन्सारी एक होते. या दाव्यात वादग्रस्त जागेची हिंदू व मुस्लिमांमध्ये वाटणी करण्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. त्याविरुद्धची अपिले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. (वृत्तसंस्था)हाशिम अन्सारी यांच्या निधनाने प्रलंबित न्यायालयीन प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही. दाव्यात नोंदलेले त्यांचे सर्व जाबजबाब व त्यांनी सादर केलेली कागदपत्रे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत. पण या प्रकरणातील सर्व बारीकसारीक माहिती अगदी सुरुवातीपासून माहीत असलेली व्यक्ती या नात्याने त्यांच्या जाण्याने पक्षकार पक्षाचे त्यादृष्टीने नक्कीच नुकसान झाले आहे.-झाफरयाब जिलानी, निमंत्रक, बाबरी अ‍ॅक्शन कमिटी