शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेजर कुगजीपुढे मृत्यूनेही टेकले गुडघे

By admin | Updated: January 28, 2017 23:44 IST

काश्मीरच्या सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात २५ फूट बफार्खाली गाडल्या गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज देत सहा दिवसांनी बाहेर आलेल्या जिगरबाज लान्सनायक हनुमंतप्पा

नवी दिल्ली : काश्मीरच्या सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात २५ फूट बफार्खाली गाडल्या गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज देत सहा दिवसांनी बाहेर आलेल्या जिगरबाज लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड याची कहाणी सर्वांना माहीत आहेच. त्यांची आठवण पुन्हा बेळगावमधील मेजर श्रीहरी कुगजी यांच्या अशाच झुंजीमुळे होत आहे. बफार्खाली १५ फूट खोल अडकलेल्या कुगजी यांनी कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही मात केली आहे.जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी होत आहे. मेजर श्रीहरी कुगजी याच भागात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी हिमस्खलनामुळे छावणीचे छप्पर कोसळले आणि ते १५ फूट बफार्खाली अडकले. सुटकेचा मार्गच दिसत नव्हता. ते अशा ठिकाणी होते की बचाव पथकाच्या दृष्टीस पडणेही अशक्य होते. पण जिगरबाज मेजर कुगजी यांनी हार मानली नाही. ते बाहेर येण्यासाठी झगडत राहिले आणि त्यात यशस्वीही झाले. बर्फ फोडण्यासाठी काही हाती लागते का, हे शोधण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले. तेव्हाच त्यांच्या हाती ट्रंकचे कुलूप लागलं. ते हाती लागताच त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी त्या कुलुपाने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. हळुहळू त्यांचे एकेक बोट बफार्बाहेर येऊ लागलं. साधारण तीन तास ते झगडत होते. त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली आणि बचाव पथकाला कुगजी यांची बोटे दिसू लागली. त्यानंतर सहकारी जवानांनी बर्फ फोडून त्यांना बाहेर काढले. मेजर कुगजी यांच्या या जिद्दीपुढे मृत्यूला गुडघेच टेकावे लागले. मेजर श्रीहरी कुगजी अद्याप सोनमर्गमध्येच आहेत. रस्त्यावर चार फूट बफार्चा थर असल्याने वाहतूक पूर्णत: बंद आहे आणि हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही तिथे पोहोचू शकत नाही. परंतु, त्यांचा पराक्रम बेळगावपर्यंत पोहोचला असून या धाडसाला सगळेच सलाम करत आहेत. (वृत्तसंस्था)