जखमी वृद्धाचा मृत्यू
By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST
नागपूर : अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोहरराव वाघ (वय ८०) असे मृताचे नाव आहे. मुलगी किरण प्रमोद चोपडे (वय ४४, रा. प्रतापनगर) यांच्या स्कुटीवरून जात असताना १० एप्रिलच्या सायंकाळी ६.५० वाजता स्टारबसच्या चालकाने त्यांना धडक मारली होती. नंदनवनमधील चामट चक्कीजवळ झालेल्या या अपघातात वाघ जबर जखमी झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी आरोपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जखमी वृद्धाचा मृत्यू
नागपूर : अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोहरराव वाघ (वय ८०) असे मृताचे नाव आहे. मुलगी किरण प्रमोद चोपडे (वय ४४, रा. प्रतापनगर) यांच्या स्कुटीवरून जात असताना १० एप्रिलच्या सायंकाळी ६.५० वाजता स्टारबसच्या चालकाने त्यांना धडक मारली होती. नंदनवनमधील चामट चक्कीजवळ झालेल्या या अपघातात वाघ जबर जखमी झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी आरोपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.---