शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

कार अपघातात नगरच्या व्यावसायिकाचा मृत्यू

By admin | Updated: April 23, 2016 00:55 IST

अहमदनगर : शुक्रवारी नगर येथील भाविकांच्या कारला कायगाव टोका (ता़ गंगापूर) येथे अपघात होऊन येथील व्यावसायिक संजय उर्फ रमणलाल झुंबरलाल भळगट (वय ४७) यांचा मृत्यू झाला.

अहमदनगर : औरंगाबाद जवळील भद्रा मारुती येथून दर्शन घेऊन परतत असताना शुक्रवारी नगर येथील भाविकांच्या कारला कायगाव टोका (ता़ गंगापूर) येथे अपघात होऊन येथील व्यावसायिक संजय उर्फ रमणलाल झुंबरलाल भळगट (वय ४७) यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य चौघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली़ हनुमान जयंतीनिमित्त औरंगाबादपासून जवळच असलेल्या भद्रा मारुती येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जातात़ गुुरुवारी शहरातील चितळेरोड येथील दिलीप शिंदे, राजेश सुंदरलाल राठोड, तेलीखुंट येथील किराणा दुकानदार संजय उर्फ रमणलाल भळगट, रोकडे व पुणे येथील त्यांचे मित्र असे पाच जण राजेश राठोड यांच्या इंडिगो मांझा कारने (एम़ एच़ १६, ए. जे. ७८७९) भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गेले होते़ शुक्रवारी पहाटे दर्शन घेऊन ते नगरला परत येत होते़ त्यांची कार कायगाव टोका येथे आली असता, कारला मालट्रकने जोराची धडक दिली़ धडक दिल्यानंतर कार दुभाजकावर आदळली़ या घटनेत कारमधील सर्वजण जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ अपघातात भळगट हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला़ राजेश राठोड व दिलीप शिंदे यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले़ मयत भळगट यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला़ (प्रतिनिधी)