नाल्यातील गाळात फसून मेंढपाळ युवकाचा मृत्यू मृत युवक बुलडाणा जिल्ाचा रहिवासी : पोहण्यासाठी उतरला आणि जीव गमावला
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
पळसोबढे : मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या बुलडाणा जिल्ातील मेंढपाळ समाजाचा २३ वर्षीय युवक गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी येथील गायरानातील नाल्यात पोहण्यासाठी उतरला असता त्याचा त्या नाल्यातील गाळात फसून मृत्यू झाला. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
नाल्यातील गाळात फसून मेंढपाळ युवकाचा मृत्यू मृत युवक बुलडाणा जिल्ाचा रहिवासी : पोहण्यासाठी उतरला आणि जीव गमावला
पळसोबढे : मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या बुलडाणा जिल्ातील मेंढपाळ समाजाचा २३ वर्षीय युवक गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी येथील गायरानातील नाल्यात पोहण्यासाठी उतरला असता त्याचा त्या नाल्यातील गाळात फसून मृत्यू झाला. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.बुलडाणा जिल्ाच्या खामगाव तालुक्यातील टाकळी तलाव येेथील रहिवासी असलेला राजू पांडू येळे हा २३ वर्षे वयाचा मेंढपाळ त्याच्या गावातील मेंढपाळ लोकांसोबत मेंढ्या घेऊन येथे आला होता. येथील गायरानात एक मोठा नाला आहे. त्या नाल्यात बराच गाळ साचलेला असल्याने त्यात कुणीही पोहण्यासाठी जात नाही. परंतु, या बाबीची जाणीव नसल्याने राजू येळेने त्या नाल्यात भरपूर पाणी असल्याचे वाटल्याने त्या पाण्यात पोहण्यासाठी उडी घेतली असता तो त्या गाळात फसला. त्याची आरडाओरड ऐकून जमा झालेल्या मेंढपाळ लोकांनी बर्याच प्रयत्नांती दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेची माहिती लोकांनी बोरगाव मंजू पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तेथे पोहोचून पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)००००००००००००००००००००००००००००००००००००