शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

निधन वार्ता : बापू झाडगे

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

केडगाव : नाथाचीवाडी येथील बापू झाडगे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राहू सोसायटीचे सचिव रामदास झाडगे यांचे ते वडील होत.

मधुकर पिचड यांची माहिती
नाशिक : गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू झालेले आंदोेेलन पाहता त्याची धग आता महाराष्ट्रातही लागत असून, धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण देऊ नये, तसेच केळकर समितीच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मुद्यांवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली.
आदिवासी समाजाच्या घटनादत्त आरक्षणात इतर कोणत्याही (धनगर, कोष्टी, कोळी) समाजाला घालण्यासाठी केंद्र सरकारने शिफारस करू नये, राजकीय हेतुसाठी आरक्षण देण्यात येऊ नये, त्यांना इतर कोणतेही आरक्षण दिल्यास आमची हरकत नाही. भारतीय घटनेने आदिवासींचे हितकर्ते म्हणून राज्यपालांना विशेष अधिकार दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील एक कोटी पाच लाख १० हजार २१३ खर्‍या आदिवासींचे मूलभूत हक्कांचे संरक्षण करावे, तसेच राज्य सरकारने समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नावरील उच्चस्तरीय समिती श्री. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केली होतीे. या समितीने केलेल्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच राज्यभरातील आदिवासी विकास विभागांतर्गतच्या वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये अद्यापही अनेक आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिंनींना प्रवेश मिळत नाही. बहुतांश आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये पोषण आहारासह अनेक बाबींमध्ये विद्यार्थ्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासर्व प्रश्नांबाबत लवकरच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, के. के. सोनवणे, विनायक माळेकर, कैलास शार्दुल, सोनिया जावळे, विशाल माळेकर, बबलू चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)