शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

डिअर योगा...तू हमसे ना होगा!

By चंद्रशेखर कुलकर्णी | Updated: July 26, 2017 12:05 IST

आमच्या आरोग्यासाठी दुसऱ्यांनी व्यायामाचा संकल्प सोडावा म्हणजे टू मच की नाही? हल्ली फिटनेसच्या नावाखाली जिम किंवा योगा सेंटर्स चालवणारी मंडळी सोकावली आहेत.

- चंद्रशेखर कुलकर्णीनरेंद्र मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेलं भन्नाट यश हा निव्वळ योगायोग होता की आणखी काही, याची चर्चा विरण्याच्या आतच मोदींनी जगाला योगाच्या घाण्याला जुंपलं. युनोनं २१ जूनचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर करून टाकला. आजच्या दिवशी देहाच्या घड्या घालण्याच्या नादात आळशी मंडळींच्या सुशेगाद सुस्त दैनंदिनीची घडी विस्कटली. आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा करण्याच्या मोदींच्या प्रस्तावाला तब्बल १७५ देशांनी सहमती दिली आणि जगभरातल्या आळशी मंडळींवर शवासन सोडून शीर्षासन करण्याची वेळ आली. प्रश्न योगाची टिंगल करण्याचा नाही. पण आमच्या आरोग्यासाठी दुसऱ्यांनी व्यायामाचा संकल्प सोडावा म्हणजे टू मच की नाही? हल्ली फिटनेसच्या नावाखाली जिम किंवा योगा सेंटर्स चालवणारी मंडळी सोकावली आहेत. शक्तीपेक्षा बुद्धीवर जास्त भिस्त असलेल्यांच्या उरावर हा योगा स्वार होऊ पाहतोय. या असल्या व्यायामाचा पुरस्कार करणाऱ्यांनी तोळामासा प्रकृतीच्या मंडळींच्या मनावर दबाव आणण्याचा चंगच बांधलाय जणू ! 

व्यायामाने किंवा त्याचंच भावंड असलेल्या योगाने किती फायदे होतात, याची जंत्री सारखी तोंडावर फेकली जाते. आरोग्य सुधारतं, पचनशक्ती वाढते, पोटाचे विकार होत नाहीत, पेशींना आॅक्सिजनचा पुरवठा मुबलक होतो... एक ना अनेक लाभ...कोणे एके काळी मुंबई-पुणे अन्् ठाण्यात अनेक नामवंत योगी पुरुषांनी योगाच्या निमित्तानं लोकांना देहाच्या घड्या घालायची सवय लावली. या प्रोसेसमध्ये सामान्य माणसाला पडणारे प्रश्न बासनात गुंडाळले गेले. त्या प्रश्नांची उत्तरं आपण काय युनोकडं मागायची? उभ्यानं खाली वाकून गुडघे न वाकवता पायाचे अंगठे धरण्याच्या क्रियेचा पचनाशी, चयापचयाशी किंवा गेला बाजार पाठीच्या मणक्याशी काय संबंध? एखाद्याला नाही धरता येत असे अंगठे, पण म्हणून त्याला हिणवायचं कशाला ? व्यायाम का करावा, याचं उत्तर अनेक बुद्धीवानांना सापडलेलं नाही. म्हणूनच "तुमसे ना हो पायेगा" हा डायलॉग नेहमीच लक्षात येतो. व्यायामाबद्दल आपल्याकडं काही अक्सीर इलाज पूर्वापार चालत आलेत. 

बरं वाटत नसेल, तर एक सल्ला घरोघरी हमखास दिला जातो...पड जरा, बरं वाटेल! तशाच पद्धतीनं स्वातंत्र्याच्या अगोदरच्या पर्वात औंध संस्थानाच्या पंत प्रतिनिधींनी सूर्य नमस्काराचं मार्केटिंग केलं होतं. सगळ््यावर एकच जालीम उपाय...सूर्य नमस्कार...पोट बिघडलंय...घाल सूर्य नमस्कार. लग्न जुळत नाहीये...घाल सूर्य नमस्कार. अशा व्यायाम व्रताला आचार्य अत्र्यांनी चक्क साष्टांग नमस्कार घातला होता. बरोबर होतं म्हणा, त्यांचं. कारण एकदा का व्यायामाचा संकल्प सोडला की आयुष्याचं टाइमटेबल बदलून जातं. हौशे-नवशे कागदावर टाइमटेबल तयार करतात. पहाटे-पहाटेचा गजर लावतात. सकाळी सकाळी व्यायाम करण्याचं टाइम टेबल नेटानं पाळलं की चाकरमान्यांना दाढी करायलाही सवड मिळत नाही. मग आॅफिसमध्ये विचारणा सुरू होते...काय तब्बेत बरी नाहीए का ? मग विचारांचा भुंगा सुरू होतो. योगा-व्यायाम केल्यानं कोणताही एचआरवाला इन्सेन्टिव्ह देत नाही. तशात आपलं सगळंच अनियमित...काम, झोप, पगार...कशाकश्शात नियमितता नाही. मग हे नियमित करावं लागणारं भूत उरावर कशापायी घ्यायचं?

तसं पाहिलं तर दुसऱ्याचं फिजिक ही आपल्याला हेवा वाटण्याजोगी गोष्ट असूच कशी शकते ? बॉलीवूडमधले मोठे स्टारही सिक्स अन् एट पॅक्सची स्पर्धा करत राहिले. त्यासाठी दिवसाचे चार-दोन तास व्यायामात घालवायचे अन् ग्रीक योद्ध्यासारखे बाहू फुरफुरले की धन्यता मानायची, यात कसला आलाय पुरुषार्थ? सर्कशीतला ट्रॅपीज हाही तसा डोळयांना भावणारा प्रकार. तो आवडला म्हणून कोणी घरात दोर बांधून कसरती करायच्या फंदात पडतं का ? प्रामाणिकपणे सांगायचं तर योगा हा तसा आळशी लोकांचा व्यायाम. अर्धं मिनिट श्वास अडकवून ठेवल्यानं काय मिळणार...डावा पाय आपल्याच मानेवर अडकवून ठेवायचा वगैरे प्रकार अघोरीच. शिवाय आॅफिसला अधूनमधून दांडी मारायची वेळ आली, तर आरोग्यापेक्षा अनारोग्यच कामी येतं. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे इंग्रजी अल्फाबेट्समधला ओ देखील एक शेपच आहे, हे पिंपासमान देहयष्टी असलेल्यांनी कायम ध्यानात ठेवायचं. शिवाय व्यायाम ही एक कला असून ती सगळ््यांना वश होईल, असं मानण्याचं कारण नाही. आरोग्याचं म्हणाल, तर ते मनाच्या तारुण्यावर अवलंबून असतं. त्यासाठी अष्टांगाच्या घड्या घालण्याची गरज नाही. कारण आरोग्य हे आरामखुर्चीत बसूनही टिकू शकतंच की!त्यामुळे आज ठरवून टाकलं...आम आदमीच्या वतीनं युनोसाठी संदेश पाठवायचा...डिअर योगा...तू हमसे ना होगा !

( हे विडंबन वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा)