लग्नाच्या पुर्वसंध्येलाच पे्रयसी अपघातात ठार
By admin | Updated: November 22, 2015 23:15 IST
जळगाव: नाशिक येथून दुचाकीने जळगावात येत असताना मागून आलेल्या गॅस टॅँकरने धडक दिल्याने टायरमध्ये दबून रेखा राजेंद्र शिंपी (वय २२, रा.तारखेडा ता.पाचोरा) ही तरुणी जागीच ठार झाली तर तिचा प्रियकर दीपक चंद्रकांत महाजन (वय २५, रा.नशिराबाद) हा जखमी झाला. हा अपघात रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता महामार्गावर एकलग्न गावाजवळ घडला. अपघातानंतर टॅँकर चालक फरार झाला आहे.
लग्नाच्या पुर्वसंध्येलाच पे्रयसी अपघातात ठार
जळगाव: नाशिक येथून दुचाकीने जळगावात येत असताना मागून आलेल्या गॅस टॅँकरने धडक दिल्याने टायरमध्ये दबून रेखा राजेंद्र शिंपी (वय २२, रा.तारखेडा ता.पाचोरा) ही तरुणी जागीच ठार झाली तर तिचा प्रियकर दीपक चंद्रकांत महाजन (वय २५, रा.नशिराबाद) हा जखमी झाला. हा अपघात रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता महामार्गावर एकलग्न गावाजवळ घडला. अपघातानंतर टॅँकर चालक फरार झाला आहे.सोमवारी होते लग्नरेखा व चंद्रकांत यांच्यात प्रेमप्रकरण होते. दोघंही घरातून पळून गेलेले होते. रेखा हिच्याबाबतीत पाचोरा पोलीस स्टेशनला मिसींगची तक्रार दाखल आहे. विवाहासाठी दोघांनी एक महिन्याआधी जळगाव न्यायालयात नोंदणी केलेली होती. त्यानुसार सोमवारी दोघांचा रजिस्टर विवाह होणार होता. त्यामुळे रविवारी दोघंही नाशिक येथून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एस.६०४४) जळगावला येत असताना एकलग्न गावाजवळ एरंडोलकडून येणार्या गॅस टॅँकरने (क्र.६१६३ अपुर्ण आहे) दुचाकीला धडक दिली. त्यात रेखा ही खाली पडून टायरमध्ये सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाचा चेंदामेंदाटायरमध्ये सापडल्याने मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. पाळधीचे सहायक पोलीस निरीक्षक डी.के.ढुमणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तर जखमी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, ही घटना घडल्यानंतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. टॅँकरचालक फरार होण्यात यशस्वी झाला. घाईघाईत लोकांना त्याचा अपुर्ण क्रमांक लिहीला.