शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओळख न पटविताच मृतदेह पुरला-१

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

ओळख न पटविताच मृतदेह पुरला

ओळख न पटविताच मृतदेह पुरला
अजनी पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस : कुटुंबीय मानसिक धक्क्यात

नागपूर :
संदिग्ध अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाची ओळख न पटविताच तो बेवारस समजून पुरण्यात आला. अजनी पोलिसांनी केलेला हा निष्काळजीपणा गुरुवारी उघडकीस आला.या घटनेमुळे मृत तरुणाचे कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. स्वत:ची चूक लक्षात येताच अजनी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
राहुल देवेश खंडागळे (२५) रा. हावरापेठ असे पुरण्यात आलेल्या मृताचे नाव आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील भाऊ सुरेंद्र आणि मिलिंद आहेत. वडील छिंदवाडा येथील गावात राहतात. दोघेही भाऊ वाहन चालक आहेत तर आई मोलकरीण आहे. राहुल नेहमी बाहेरगावी टूरवर राहत असल्याने त्याचे घरी येणे-जाणे कमीच होते. ११ जून रोजी रात्री राहुल घरी आला. काही वेळ थांबला आणि नवीन कपडे घालून रात्री १०.३० वाजता रवाना झाला. त्याने मोठा भाऊ सुरेंद्र याला सांगितले होते की, तो टूरवर जात आहे. राहुलजवळ मोबाईल होता. परंतु सिम कार्ड नसल्याने सुरेंद्रने त्याला सिमकार्ड विकत घेऊन फोन करण्यास सांगितले. राहुल घरून निघाला आणि शताब्दीनगर चौकातील ऑटो स्टॅँडवर गेला. सुरेंद्रने त्याला जाताना पाहिले.
यानंतर रात्री ११.५० वाजता मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी अजनी पोलिसांना रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील वॉर्ड क्रमांक ३४ च्या समोरील भिंतीवरून पडून एक तरुण जखमी झाल्याची सूचना दिली. तो तरुण राहुलच होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला आकस्मिक विभागात भरती केले. तिचे त्याचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांना राहुलच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड आणि मोबाईल सापडला. परंतु अजनी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना शोधण्यास गंभीरता दाखविली नाही. पोलिसांनी बेवारस मृतदेहाला तीन दिवस ठेवण्याची आवश्यकता तेवढी पूर्ण केली. त्यानंतर गंगाबाई घाटावर नेऊन मृतदेह पुरला. यादरम्यान राहुल टूरवर असल्याचे समजून त्याच्या कुटुंबीयांनी फारसे लक्ष दिले नाही. बेवारस मृतदेहाच्या कुटुंबीयांना एक महिन्यानंतरही शोधता आले नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजनी पोलिसांना फटकारले तेव्हा कुठे अजनी पोलीस कामाला लागले.