शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

'गोध्राची पार्श्वभूमी असणाऱ्या मोदींच्या काळात संविधान धोक्यात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:50 IST

इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला.

मुंबई : इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा इशारा आहे. गोध्रा हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली नाही, उलट त्यानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या, दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाली, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते आज देशाच्या पंतप्रधानपदी आहेत आणि संविधान धोक्यात आहे. हे वेगळे सांगायला नको, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान वाचवा, देश वाचवा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजन केले होते. पवार यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यप्रणालीवरही जोरदार टीका केली. गोळवलकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत ‘बेंचेस आॅफ थॉट’ या पुस्तकातून टीका केली होती. अशांच्या विचारांवर चालणारा भाजपा आहे. ते संविधानाविषयी करत असलेली वक्तव्ये धादांत असत्य आहेत, असेही पवार यांनी सांगितले.मध्यंतरी भाजपाचे मंत्री हेगडे यांनी संविधानाविरोधात वक्तव्य केले. त्यावर ते त्यांचे वैयक्तिक मत होते, असे सांगण्यात आले. परंतु त्यांनी एकप्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांचे विचार स्पष्ट केले होते. गोळवलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही शब्दांबाबत पवार यांनी शंका उपस्थित केली. राज्य घटना इतर देशांतून उचलून तयार केली आहे. ती परदेशी विचारधारेवर आधारीत आहे. त्यामुळे ती आपली म्हणण्याचे कारण नाही, असे संबंधित पुस्तकात म्हटले आहे. त्याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्य घटना मानत नाहीत, असे पवार म्हणाले. दलित, अल्पसंख्याक, आदिवासींवर अन्याय झाला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना संरक्षणही दिले पाहिजे, असे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.खा. सुप्रीया सुळे, फौजिया खान, खा. माजीद मेमन यांनीही मार्गदर्शन केले. माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे, खा. वंदना चव्हाण, आ. विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, डॉ. भारती पवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. महिला आरक्षण, संविधान बचाव, महिला अत्याचार विधेयक ठराव उषाताई दराडे, सुरेखा ठाकरे, डॉ. आशा मिरगे यांनी मांडले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार