प्रकट दिन....
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
ठिकठिकाणी गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात
प्रकट दिन....
ठिकठिकाणी गजानन महाराज प्रकट दिन उत्साहातनागपूर : श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा, मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्रींच्या पालखीत भाविकांनी गजानन महाराजांचा जयघोष केला. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कामठीतालुक्यातील न्यू येरखेडा येथील श्री गजानन धाम मंदिरात अभिषेक, पूजन, आरती व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी पंडित शालिकराम, मंदिर कमिटीचे अध्यक्ष लिओ नाट यांच्या हस्ते अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, सरपंच मनीष कारेमोरे, मधूर डेनियल, सचिन भोयर, अनिल देशमुख, आशिष डेनियल, राधा मथुरे, प्रमिला मेंढे, दीपाली वानखेडे, अमित भोयर, राजेश बनसिंगे, बबन काळे, शरद भोयर, कुलदीप झेलपुरे आदींसह हजारो भाविक उपस्थित होते. तारसायेथील संत गजानन महाराज मंदिर (मठ) येथे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात पार पडला. गजानन महाराजांच्या मूर्तीचा मोठ्या श्रद्धेने अभिषेक करून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. हरिपाठ, काकडा, पारायण, महाआरती आदी कार्यक्रम पार पडले. उत्सवात कलाबाई पडोळे यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले. प्रसंगी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास परिसरातील निमखेडा, चाचेर, नवेगाव, आष्टी, मौदा आदी अनेक गावातील भाविकांनी हजेरी लावली. उत्सवास फुलचंद पिसे, बाळकृष्ण खंडाईत, गजानन नागतोडे, विष्णू देशमुख, वासुदेव देशमुख, सदानंद लंगडे व ग्रामस्थांनी सहकार्य केले. येथील मंदिरात ४० वर्षांपासून प्रकट दिनाचे अविरत आयोजन केले जाते.