शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदला यूएईचा दणका, 15 हजार कोटींची संपत्ती जप्त

By admin | Updated: January 4, 2017 06:49 IST

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला संयुक्त अरब अमिराती(यूएई) च्या सरकारने जबर दणका दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 3 - मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा  कुख्यात डॉन दाऊद  इब्राहिमला संयुक्त अरब अमिराती(यूएई) च्या सरकारने जबर दणका दिला आहे. यूएई सरकारने दाऊदची त्यांच्या देशातील 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या संदर्भातील वृत्त झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
या वृत्तानुसार दाऊदने यूएईमध्ये हॉटेल, मॉल्स आणि इतर कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र, गैरमार्गाने जमविण्यात आलेल्या दाऊदच्या या संपत्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  भारत सरकारकडून सातत्याने करण्यात येत होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या वर्षी केलेल्या य़ूएई दौऱ्यादरम्यान  दाऊदच्या संपत्ती संदर्भातील कागदपत्रे यूएई सरकारला सोपवली होती. त्यानंतर दाऊदच्या संपत्तीबाबत यूएई सरकारकडून चौकशी सुरू होती. अखेर यूएई सरकारने दाऊदच्या 15 हजार कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. 
 
(यूएई दौ-यात मोदींचे मिशन दाऊद, संपत्तीवर टाच आणणार ?)